घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात आरोग्य यंत्रणेचा ताण आणखी वाढणार, एकाच वेळी शेकडो डॉक्टर होणार निवृत्त

महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणेचा ताण आणखी वाढणार, एकाच वेळी शेकडो डॉक्टर होणार निवृत्त

Subscribe

शासनाने सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघटनेची मागणी

राज्यात कोरोनाचा कहर कायम आहे. त्यात आता पुढील काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली. पुढील काळात आरोग्य यंत्रणा आणखी कोलमड्याची शक्यता आहे. कारण आरोग्य यंत्रणेतील तब्बल ५५० डॉक्टर सेवानिवृत्त होण्याच्या दिशेत आहे. ३१ मे रोजी विविध जिल्हा,उपजिल्हा आणि आरोग्य केंद्रावरील ५५० हून डॉक्टर सेवानिवृत्त होणार आहे. एकाच वेळी शेकडो डॉक्टर सेवानिवृत्त होणार असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण आणखी वाढणार आहे.

कोरोनाच्या काळात डॉक्टरच देवदूत बसून रुग्णांच्या मदतीला धावून आले आहेत. परंतु ज्यांटे वय ६० वर्षांपर्यंत आले आहे असे डॉक्टर आपल्या सेवेतून निवृत्त होणार आहेत. कोरोना महामारित डॉक्टरांची राज्याला सर्वात जास्त गरज आहे. त्यामुळे शासनाने सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघटनेने केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेही निवदेन दिले आहे.

- Advertisement -

इतक्या मोठ्या संख्येने डॉक्टर एकाच वेळी निवृत्त झाले तर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होईल. एकीकडे रुग्णांना ऑक्सिज, बेड वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यात डॉक्टर्सची सुद्धा कमी जाणावायला लागली तर राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

राज्यात काल ४६ हजार ७८१ नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८१६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% इतका आहे. तर काल  राज्यात ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – लसीकरणाच्या जबाबदारीपासून राज्य सरकार पळ काढतंय, दरेकरांचा आरोप

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -