घरठाणेआई वडिलांचे छत्र हरपलेल्यांसाठी मदतीचे शेकडोचे हात सरसावले

आई वडिलांचे छत्र हरपलेल्यांसाठी मदतीचे शेकडोचे हात सरसावले

Subscribe

म्हारळगावात माणुसकीचे दर्शन

कल्याण । कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात सध्या माणुसकीचे अनोखे दर्शन घडत आहे. पाच ते सहा दिवसापूर्वी गावातील सुर्यानगर परिसरात राहणार्‍या रंजना उमाजी कांबळे यांचे घरावरील स्लॅब कोसळून दु:खद निधन झाले.
एक वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यामुळे आईवडिलाविना पोरके झालेल्या मुलांना आधार, मदत देण्यासाठी,विविध संस्था,संघटना पुढे सरसावल्या आहेत. आतापर्यत शेकडो लोकांनी मदत देऊ केली आहे. त्यामुळे म्हारळ गावात अनोख्या माणुसकीचे दर्शन पाह्याला मिळत आहे.

मागील शुक्रवारी म्हारळ गावातील सुर्यानगर येथे राहणार्‍या रंजना उमाजी कांबळे या घरकाम करणार्‍या महिलेच्या अंगावर घराचे स्लॅब कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर मुलगी प्रज्ञा ही जबर जखमी झाली. मुलगा राज आणि दुसरी मुलगी बाजूच्या खोलीत झोपायला गेल्याने सुदैवाने बचावले.

- Advertisement -

अशातच मुलगी प्रज्ञा हिचा उजवा डोळा निकामी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच तिच्यावर चार ते पाच शस्त्रक्रिया करावयाच्या आहेत, निराधार झालेल्या कुटुंबाला म्हारळ गावातील आम्ही युवा प्रतिष्ठान ग्रुप, मी म्हारळकर आणि बौध्द विहार संघटना समन्वय समिती यांनी ‘एक हात मदतीचा’, या शीर्षकाखाली तमाम नागरिकांना या मुलांना करण्याचे आवाहन केले. यात कोणी दोनशे, पाचशे, हजार, दोन हजार अशी मदत देऊ केली. यात आजमितीस सुमारे शंभरच्या आसपास लोकांनी मदत केली आहे. सरकारची मदत मिळेल तेव्हा मिळेल, परंतु आपले काहीतरी कर्तव्य आहे,असे समजून या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरु झाला आहे. तातडीने मदत सुरू झाल्याने या भागातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांचे कौतूक होत आहे. यातून माणुसकीचे मोठे दर्शन घडले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -