घरमहाराष्ट्रठाणे : रस्ते सुरक्षा जागृती अभियानात शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

ठाणे : रस्ते सुरक्षा जागृती अभियानात शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

Subscribe

ठाण्यात लहान मुलांना रस्त्याविषयक जागृत करण्यासाठी जानेवारी २०१९ पासून नवे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

देशात सुरक्षितपणे वाहन चालवण्याची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करण्याच्या हेतूने ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’च्या विद्यमाने ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागृती अभियानाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम ठाण्यातील एसव्हीएसएस ट्री हाउस स्कूलमध्ये घेण्यात आला. ‘होंडा टू व्हीलर्स इंडिया’ने ठाण्यातील एसव्हीएसएस ट्री हाउस स्कूलमधील ४ दिवसांच्या उपक्रमामध्ये १७०० हून अधिक जणांना रस्ते सुरक्षेविषयक जागृत करण्यात आले. त्यामध्ये ‘प्रत्येकाची सुरक्षितता’ या उद्देशांतर्गत १६०० हून अधिक बालके व १५० प्रौढ सहभागी झाले होते.

१७ हजार बालके झाले जागृत

लहान मुलांना रस्त्याविषयक जागृत करण्यासाठी जानेवारी २०१९ पासून नवे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे, दरमहा विविध शहरांतील १० शाळांतील १५ हजार पेक्षा अधिक लहान मुले आणि प्रौढ यांचा समावेश करण्याचे होंडाचे उद्दिष्ट आहे. या महिन्यात हा उपक्रम ठाण्यासह १० शहरांमध्ये विस्तारण्यात आला. या उपक्रमाने आतापर्यंत १७ हजार बालके आणि ५ हजार प्रौढ यांना जागृत केले आहे. याविषयी बोलताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा.लि.चे ब्रँड व कम्युनिकेशनचे उपाध्यक्ष प्रभू नागराज यांनी सांगितले की, ‘होंडा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते आणि आतापर्यंत आम्ही २५ लाखांहून अधिक भारतीयांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले आहे. या भव्य अभियानाद्वारे, आता शालेय विद्यार्थी हसतखेळत शिकत आहेत बालकांनी संपूर्ण कुटुंबासाठी सुरक्षेचे दूत बनावे, हा आमचा उद्देश आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – वाहतूक नियम भंग : ६८,८०० रूपये दंड वसुल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -