घरमहाराष्ट्रपत्नीच्या फेसबुक फ्रेंडला फसवून बोलवले; मग चाकूने वार केले

पत्नीच्या फेसबुक फ्रेंडला फसवून बोलवले; मग चाकूने वार केले

Subscribe

पत्नीशी फेसबुकवरून चॅट करणाऱ्या तिच्या मित्राला पतीने पत्नीच्या फेसबुकवरून मेसेज पाठवत बोलवले आणि मग त्याच्यावर चाकूने वार केले. पतीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये एका पतीने पत्नीच्या फेसबुक अकाउंट वरून पत्नीच्या मित्राला मेसेज करत बोलावून घेतले. तू माझ्या पत्नीसोबत चॅटिंग का करतोस? असे म्हणून त्याच्यावर चाकूने वार केल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे. यात १९ वर्षीय तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी तरुणाने वाकड पोलिसात आरोपी विरोधात फिर्याद दिली असून सुनील राजू जाधव अस १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी गिरजेश दशरथ यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, आरोपी गिरजेश दशरथ यादव आणि फिर्यादी सुनील राजू जाधव हे दोघे जण काही वर्षांपूर्वी शेजारी राहण्यास होते. आरोपी रिक्षा चालक असून फिर्यादी तरुण हा फूड डिलिव्हरी बॉय आहे. याच दरम्यान यादव यांची पत्नी आणि सुनील जाधव हे एकमेकांशी फोन, फेसबुक चॅटिंगद्वारे संपर्कात राहू लागले होते. त्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले होते. परंतु, तिथे देखील हा प्रकार सुरूच होता. अखेर मध्यरात्री आरोपी गिरजेश दशरथ यादव याने पत्नीच्या फेसबुक अकाउंटवरून सुनील राजू जाधव यांच्या फेसबुकवर “मी तुला ओळखते तू पिंपळे सौदागरमध्ये राहतोस, तू मला सहा महिन्यांपूर्वी भेटला होतास. मी घरी एकटीच आहे, तू बळीराम कॉलनीजवळ ये”, असा मेसेज गिरजेश दशरथ यादव याने केला.

- Advertisement -

मेसेज मिळाल्यानंतर सुनील राजू जाधव दिलेल्या पत्त्यावर पोहचला, त्या दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले आणि त्यानंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. ‘तू माझ्या पत्नीला कशाला मेसेज करतोस?’, असे बोलून यादवने सुनील जाधव याच्यावर चाकूने वार केले. यात सुनील जाधव हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी गिरजेश दशरथ यादव याला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -