घरट्रेंडिंगनवरा बायकोला चावला, अन् मिळाली 'ही' शिक्षा!

नवरा बायकोला चावला, अन् मिळाली ‘ही’ शिक्षा!

Subscribe

सध्या लग्नानंतर घटस्फोटाचे प्रमाणे वाढले आहे. नुकताच पुण्यात एका अजब कारणावरून एका जोडप्याचा घटस्फोट झाला आहे. पत्नीच्या हाताच्या मनगटाचा चावा घेतल्यामुळे या जोडप्याचा घटस्फोट झाल्याचे समोर आले आहे. पतीने फॅमिली कोर्टात अनेक गुन्हे दाखल असलेल्या गुंड पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून क्रुरतेच्या मुद्यावर घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज केला होता. पतीने केलेले अर्ज न्यायाधीश एन. आर. नाईकवडे यांच्या कोर्टाने घटस्फोट मंजूर केला.

विजय आणि नम्रता (दोघांची नावं बदलली आहेत) या दोघांचे २०१४मध्ये लग्न झाले होते. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना चार मुले आहेत. पण लग्नानंतर विजय गुंडगिरीकडे वळला. त्याला अनेकदा तुरूंगात जावे लागले. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहे. विजय आणि नम्रतामध्ये नेहमी भांडण होत असे. तो नेहमी तीला शिवीगाळ करत असे. तिच्यावर संशय घेणे, लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे असे प्रकार तो नेहमी करत असे. पण केवळ संसार तुटू नये म्हणून नम्रता कायम याकडे दुर्लक्ष करत राहीली. पण २०१७ ला सप्टेंबरला झालेल्या मारहाणीत विजयने नम्रताच्या उजव्या हाताच्या मनगटाचा चावा घेतला. हा चावा इतका भयंकर होता की तिच्या मनगटाची त्वचा: लोंबकळली. ससून हॉस्पिटलमध्ये तिने उपचार घेतले. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी ती गेली असता पोलिसांनी दादच दिली नाही. त्यामुळे तिने ‘जन-अदालत’ या संस्थेकडे मदत मागितली. संस्थेतर्फे तिच्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मारहाणीची तक्रार घेतली.

- Advertisement -

विजयने कोर्टाला आपण परस्परसंमतीने घटस्फोट घेत असल्याचे सांगितले. त्यासाठी अटी- शर्ती ठरविण्यात आल्या. मात्र, त्यानंतर तो कोर्टात येण्याचे टाळू लागला. त्याच्याकडून घटस्फोट मिळावा म्हणून नम्रताने अॅड. सागर नेवसे यांच्यामार्फत दावा दाखल केला. अॅड. नेवसे यांनी कोर्टाला विजयविरुद्धचे पुरावे सादर केले. त्याची पार्श्वभूमी गुंडगिरीची असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणण्यात आले. तसेच, त्याने आशाच्या मनगटाला घेतलेल्या चाव्याचे रिपोर्ट दाखल करण्यात आले. ते लक्षात घेऊन कोर्टाने नम्रताचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -