Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! तो लग्नाचा वाढदिवस ठरला अखेरचा, पतीने केली पत्नीसह चिमुकलीची हत्या

धक्कादायक! तो लग्नाचा वाढदिवस ठरला अखेरचा, पतीने केली पत्नीसह चिमुकलीची हत्या

Subscribe

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत संशयखोरपतीने लग्नाच्या वाढदिवशीच संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे.

चारित्र्याच्या संशयातून व्यक्ती कधी काय करून बसेल हे त्याला काय कोणालाच ठाऊक नसते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत संशयखोरपतीने लग्नाच्या वाढदिवशीच संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. औरंगाबाद शहरातील वाळूज औद्योगिक परिसरातील वळद गावात ही मनाला हादरवून ठेवणारी घटना घडली आहे. पतीने पत्नीचे चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच्या चार वर्षांच्या मुलीची हत्या करत स्वतःलाही गळफास लावून घेतला. शुक्रवारी (ता. 18 मे) घडलेल्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आरोपी पती पत्नीला घरी घेऊन गेला आणि त्यानंतर त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले आहे. ( husband commits suicide by killing his wife and daughter due to suspicion of character)

हेही वाचा – मिस् कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती, सर्वसामान्यांसाठी पुढाकार

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप डांगर राजपूत (वय वर्ष 29) यांने पत्नी पूजा राजपूत (वय वर्ष 26) आणि मुलगी श्रेया (वय वर्ष 4) यांची हत्या करत स्वतः आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे. त्याने तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत हे कृत्य केलेले आहे. याआधी देखील त्याने पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केलेली होती. तर इतकेच नाही तर त्याने स्वतःच्या पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. ज्यामुळे त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या व अन्य कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पूजाचा आणि मोहनचा 2017 मध्ये प्रेमविवाह झाला होता. हे दोघे एकाच गावात राहणारे असल्याने सर्वांच्या सहमतीने यांचा विवाह लावून देण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या घरात श्रेयाचा जन्म झाला. पण गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मोहन पूजाच्या चरित्र्यावर सतत संशय घेत तिच्याशी भांडण करत होता आणि तिला मारहाण देखील करत होता. यातूनच पूजाने त्याच्यावरती पोलिसात तक्रार दाखल केल्याने त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून मोहनने तिची बदनामी करण्यासाठी तिचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल केलेला होता. या प्रकरणात देखील त्याच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

- Advertisement -

घडत असलेल्या सर्व प्रकारांना कंटाळून अखेरीस पूजाने तिच्या मुलीसह तिच्या आईकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मोहन हा गावाबाहेरील मळ्यात राहायला लागला. परंतु नातेवाईकांच्या मध्यस्थीने पुन्हा एकदा त्याने सासुरवाडीच्या शेजारीच भाड्याने खोली घेऊन राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून पूजा आणि मोहन आपल्या मुलीसह पूजाच्या आईच्या घराशेजारीच राहू लागलेले होते. पण तरीदेखील सतत होणाऱ्या वादामुळे पूजाने पुन्हा आईकडे जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी (ता. 18 मे) पूजा आणि मोहनमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. या वादामधून पूजाने आणि तिच्या आईने मोहन विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली. पण त्याच दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने त्याचेच निमित्त करत मोहन पूजाला विनवणी करत तिला घरी घेऊन गेला. याचवेळी त्याच्या हातातील केक पाहून त्यांची मुलगी श्रेया देखील त्याच्या मागे लागल्याने तो तिला देखील घरी घेऊन गेला. त्याने श्रेयाला आजीकडे राहण्याचा सल्ला दिला होता पण श्रेयाने जाण्याचा हट्ट केल्याने त्या चिमुरड्या जीवाला देखील आज प्राणाला मुकावे लागले आहे. केकसाठी श्रेया आई-वडिलांसोबत गेली नसती तर ती आज जिवंत राहिली असती, असे श्रेयाच्या आजीकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -