Homeक्राइममुंबई- आग्रा महामार्गाच्या उड्डाणपुलावरून पत्नीसमोर पतीने मारली उडी

मुंबई- आग्रा महामार्गाच्या उड्डाणपुलावरून पत्नीसमोर पतीने मारली उडी

Subscribe

मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कन्नमवार पुलावरुन पत्नीसोबत रिक्षातून प्रवास करत असलेल्या पतीने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.२५) सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घडली. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने टोकाचे उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चेतन श्रावण पवार (वय ३० रा. फिरस्ता) असे मृत पतीचे नाव आहे. (Husband jumps in front of wife from Mumbai-Agra highway flyover)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन पवार हे पत्नी राणी पवारसोबत शनिवारी (दि.२५) रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास रिक्षातून प्रवास करत होते. रिक्षा मुंबई-आग्रा महामार्गावरील कन्नमवार पुलावरून व्दारकेकडे जात होती. काही समजण्याच्या आतच चेतन पवार यांनी कन्नमार पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. ही बाब नागरिकांना समजताच त्यांनी घटनास्थळी येत जखमी पवार यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. चेतन पवार यांनी पत्नीसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले आहे. आत्महत्येच्या घटनेनंतर पोलीस, महामार्गावरून ये-जा करणार्‍या वाहनचालक व प्रवाशांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चेतनने आत्महत्या का केली याचा तपास आडगाव पोलीस करत आहे. पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.