Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र भयंकर! संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात घातले डंबल्स आणि...

भयंकर! संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात घातले डंबल्स आणि…

...आणि पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह खोलीत लपवून ठेवला.

Related Story

- Advertisement -

कित्येकदा घरा-घरात पती-पत्नीमध्ये भांडणं होताना दिसतात. मात्र औरंगाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात झालेल्या लहानशा वादानंतर संतापलेल्या पतीने थेट आपल्या पत्नीच्या डोक्यात डंबल्स घालून तिची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री समोर आली. पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह खोलीत लपवून ठेवला. एवढेच नाही तर पत्नीचा मृतदेह ठेवलेल्या खेलीतच आपल्या दोन मुलांना कोंडून हा नराधम पतीने घरातून पळ काढला.

असा घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद पिसादेवी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या सिद्धेश त्रिवेदी आणि त्याची पत्नी कविता त्रिवेदी यांच्यात घरगुती वाद झाला. हा वाद मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास झाला. यावेली लहानशा वादातून पतीचा संताप अनावर झाला आणि त्याने आपल्या पत्नीच्या डोक्यात व्यायामासाठी आणलेले ८ किलो वजनाचे डंबल्स घातले. यामुशे तिचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या पत्नीला घरातील खोलीत बंद केले. यासोबत त्याचा आठ वर्षांचा मुलगा व चार वर्षांच्या मुलीलाही त्याच खोलीत कोंडून सिद्धेश त्रिवेदी याने भितीपोटी पळ काढला.

- Advertisement -

दरम्यान, खूप वेळ झाल्याने घराचे दार उघडले नाही, घराला कुलूप असताना आतून रडण्याचा आवाज येत असल्याने शेजाऱ्यांची त्याच्या घराकडे धाव घेतली. यावेळी खिडकीतून डोकावून पाहिले असता मुले रडत असल्याच्या त्यांना आवाज आला. त्यांनी दार तोडून मुलांना बाहेर सुखरूप बाहेर काढले. मात्र कविता त्रिवेदी यांची हत्या झाल्याचे शेजाऱ्यांना समजले. यावेळी नागरिकांनी तातडीने चिकलठाणा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -