घरट्रेंडिंगरुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी नवऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन; व्हिडिओ व्हायरल

रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी नवऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन; व्हिडिओ व्हायरल

Subscribe

नवरा-बायको यांच्यात वाद झाल्यास नाराज आपल्या नाराज बायकोचे मन वळवण्यासाठी पती हवे ते प्रयत्न करतो. अशीच काहीशी घटना जालन्याच्या दाभाडी गावात घडली आहे.

नवरा-बायको यांच्यात वाद झाल्यास नाराज आपल्या नाराज बायकोचे मन वळवण्यासाठी पती हवे ते प्रयत्न करतो. अशीच काहीशी घटना जालन्याच्या दाभाडी गावात घडली आहे. एका तरुणाने बायको सोडून गेल्याने तिला परत आणण्यासाठी दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर (Mobile Tower) चढला. गणपत बकाल असे या तरुणाचे नाव आहे. गणपत हा जवळपास चार तास टॉवरवर बसून होता. टॉवरवर चडून तो “बायको मला सोडून माहेरी गेली, तिला परत आणा अन् मला घरकूल द्या”, अशी मागणी वारंवार करत होता. (husband stand on mobile tower for demand bring back his wife badnapur dabhadi village jalana)

गणपत टॉवरवर चढून जोरजोरात ओरडत असल्याचे समजताच गावकऱ्यांनी गणपतला टॉवर वरून खाली उतरण्यासाठी खुप प्रयत्न केले. अनेकांनी त्याची खिल्ली उडवत “तुला आमदार करतो, खाली उतर”, असे म्हटले. मात्र तरीही तो खाली उतरत नव्हता.

- Advertisement -

गणपत हा दारुच्या नशेत टॉवरवर चढला होता. गावकरी आणि सर्व यंत्रणांनी प्रयत्न करूनही तो खाली उतरत नव्हता. जवळपास चार तासांनतर तो खाली उतरला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

गणपत बकाल हा बदनापूर तालुक्यातील दाभाडी गावात राहणारा रहिवाशी आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. गणपत बकाल हा मोबाईल टॉवरवर चढला होता. टॉवरवर चढून तो सतत “माझी बायको माहेरी गेली, तिला परत आणा, तसंच मला घरकूल मिळवून द्या” अशी मागणी करत होता.

- Advertisement -

दरम्यान, गणपतने दारूच्या नशेत कृत्य केल्याची माहिती मिळताच परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी गावकऱ्यांनी या तरुणाला टॉवर वरून खाली उतरण्यासाठी खुप प्रयत्न केले. पोलिसांचा फौजफाटा देखील घटनास्थळी दाखल झाला. मात्र पोलिसांनी खाली उतरण्याचे आवाहन करून सुद्धा तो खाली आला नाही. त्यानंतर मात्र अग्निशमन दलाचे पथक मागविण्यात आले. मात्र तेव्हाही तो खाली उतरला नाही.


हेही वाचा – द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा, कोण होणार भारताचे नवे राष्ट्रपती? आज निकाल होईल जाहीर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -