घरक्राइमभांडणाच्या रागात पतीची पत्नीकडून गळा आवळून हत्या; बीडमधील दुसरी घटना

भांडणाच्या रागात पतीची पत्नीकडून गळा आवळून हत्या; बीडमधील दुसरी घटना

Subscribe

बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये पती आवडत नसल्याने पत्नीने त्याची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना ताजी असतानाच सोमवारी अशीच एक घटना परळी तालुक्यात घडल्याची माहिती समोर येत आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये पती आवडत नसल्याने पत्नीने त्याची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना ताजी असतानाच सोमवारी अशीच एक घटना परळी तालुक्यात घडल्याची माहिती समोर येत आहे. परळीमध्ये पत्नीने दोरीच्या सहाय्याने पतीचा गळा आवळून त्याचा खून केला. (Husband strangled by wife in anger of quarrel Another incident in Beed)

हनुमान ऊर्फ राजाभाऊ अशोक काकडे (३०) असे हत्या केलेल्या पतीचे नाव आहे. अशोक काकडेचे त्याची पत्नी वैष्णवी हिच्यासोबत ११ नोव्हेंबर रोजी जोरदार भांडण झाले होते. या भांडणाच्या रागात पत्नी वैष्णवीने खोलीचा दरवाजा लावला आणि पती अशोक काकडेचा गळा दोरीने आवळला.

- Advertisement -

अशोक काकडेच्या हत्येनंतर त्या खुनाचा आरोप आपल्यावर येऊ नये यासाठी पत्नी वैष्णवीने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. छताला दोरी अडकवून दरवाजा उघडला आणि बाहेर येत पतीने जीव दिल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास केला.

त्यानंतर पोलिसांनी अशोक काकडेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यावेळी शवविच्छेदन अहवालामध्ये अशोकचा गळा दाबल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी वैष्णवी विरोधात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

गेवराईत पतीचा पत्नीकडून गळा आवळून खून

रविवारी ही अशीच घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे घडली. पांडुरंग चव्हाण यांचे एका शितल नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. परंतु लग्न झाल्यापासून शितल पतीला कायम धुसफूस करायची. तू मला आवडत नाही, असे सातत्याने म्हणायची. त्यानंतर एकेदिवशी त्याचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे नातेवाईकही संतप्त झाले होते.

या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली. पती आवडत नसल्याने शितलनेच पतीचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले. पत्नीने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. गेवराई पोलिस ठाण्यामध्ये याप्रकरणी शितलविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पांडुरंग चव्हाणच्या आईने याबाबतची तक्रार दिली होती. त्यानंतरच हा प्रकार उघड झाला.


हेही वाचा – पीएमपीएमएल चालक आणि दुचाकीस्वाराची हाणामारी; पुण्यातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -