घरमहाराष्ट्रचारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्यास आजन्म कारावास

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्यास आजन्म कारावास

Subscribe

पाच हजारांचा दंड

पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या पतीस पुणे सत्र न्यायालायाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी.पी. अग्रवाल यांनी पुण्यातील पत्नीच्या मारेकर पतीला मयेपर्यंत जन्मठेप (आजन्म कारावास) आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव राजू दुसाणे (रा. आकाशनगर, वारजे) असे आहे. आरोपी पती राजू दसाणे याने ३० जानेवारी २०१५ रोजी आपल्या राहत्या घरी पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. याप्रकरणात विनोद दाभाडे या व्यक्तीने आरोपी पती राजू विरोधात तक्रार दाखल केली.पती राजू याने घटनेच्या एक महिन्यापूर्वी पत्नी सविता(बदललेले नाव) हिच्या फोनवर एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. हे पतीने राजूने पाहिले होते. त्यादिवसानंतर तो पत्नी सविताच्या चारित्र्याचा संशय घेऊ लागला. तिला मारझोड करत होता. एक दिवस त्याने रागात सविताच्या साडीचा पदरही पेटवून जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी घरात असलेल्या मुलीने आईच्या साडीची आग विझवत तिचा जीव वाचवला. याघटनेनंतर राजू आणि सवितामध्ये कडाक्याचे भांडण झाले. याचदरम्यान राजू याने रागाच्या भरात सवितावर कुऱ्हाडीने सपासप वार करुन तिची हत्या केली. त्यानंतर रक्तांनी माखलेल्या कपड्यांवरच वारजे पोलीस स्थानक गाठले आणि पोलिसांनी पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सविताला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र सविता घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या मानेवर आणि डोक्यावर गंभीर कुऱ्हाडीचे घाव बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेपूर्वी एक महिना आधी सविता हिला एक फोन आला होता. हे राजू याने पाहिले होते. तेव्हापासून तो सविताच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. एकदा त्याने सविता हिच्या साडीचा पदरही पेटवून दिला होता. तिच्या मुलीने ही आग विझविली होती. चारित्र्याच्या संशयावरुन घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी राजू याने सवितावर कु-हाडीने वार करुन तिचा खून केला. त्यानंतर तो रक्ताने भरलेल्या कपड्यांसह वारजे पोलीस ठाण्यात हजर झाला.तेथील पोलिसांना मी पत्नीचा खुन केल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन घरी गेले. तेव्हा सविता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या मानेवर व डोक्यावर वार करण्यात आले होते. या दुसाणे दामप्पत्याला २ मुली व एक मुलगा आहे. याप्रकरणी सरकारी वकिल सुनील मोरे यांनी हा खटला परिस्थिती जन्य पुराव्यावर आधारीत होता. त्यामुळे घटनास्थळावरून आरोपींचे कपडे आणि कुऱ्हाड जप्त करण्यात आली होती. वैद्यकीय अहवाल व इतर बाबींवर गुन्हा सिद्ध करता आला. असे स्पष्ट केले. हत्येच्या ठिकाणीहून ९ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. या सरकारी वकिलाने सादर केले पुरावे आणि युक्तीवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायालयाने आरोपी पती राजू दुसाणे याला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisement -

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -