दिराशी शरीरसंबंध ठेवण्यास पतीचा आग्रह; किळसवाणी घटना उघड

नाशिक : दीर वारंवार विनयभंग करत शरीरसुखाची मागणी करत असल्याची तक्रार पत्नी पतीकडे केला. मात्र, पतीनेच उलट पत्नीला दिराशी संबंध ठेव असे सांगितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दीर आरिफ आबीद खान, पती आसिफ आबीद खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व महिलेच्या फिर्यादीनुसार, पीडित महिला सासरी घरातील किचनरुममध्ये काम असताना दीर आरिफ खान याने विनयभंग केला. काही दिवसांनी परत दिराने वहिनीचा विनयभंग करत शरीरसुखाची मागणी केली. यावेळी तिने नकार दिला असता दिराने धमकी दिली. ही बाब पत्नीने पतीला सांगितली असता पतीने तिला दिराशी संबंध ठेवण्यास सांगितले. अडचणीत सापडलेल्या महिलेने खूपच जास्त त्रास होत असल्याने तसेच दबाव वाढत असल्याने अखेर गंगापूर पोलीस ठाणे गाठत पती आसिफ आदीब खान तसेच दीर आरीफ आदीब खान यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किळसवाणी घटना 

कुठलीही मुलगी आपल्या पतीला सर्वस्व मानत त्याच्या सोबत आपले जीवन व्यतीत करायला तयार होते. त्यालाच आपल सर्वस्व मानते. मात्र, तोच पती अशा पद्धतीने तिचा घात करणे अत्यंत किळसवाणे आहे.