घरताज्या घडामोडीशिर्डीच्या साईबाबांचरणी ४० लाखांचा सुवर्ण मुकूट दान

शिर्डीच्या साईबाबांचरणी ४० लाखांचा सुवर्ण मुकूट दान

Subscribe

शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी अनेक भक्तगण कोट्यवधींचं दान देत असतात. आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानिमित्ताने अनेकजण स्वखुशीने साईबाबांच्या झोळीत दान टाकत असतात. अशाचप्रकारे, हैदराबाद येथील डॉ. रामकृष्णा मांबा यांनी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी ४० लाख रुपये किंमतीचा ७४२ ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे.

शिर्डीतील साईबाबांच्या दरबारी अनेक भक्तगण आशिवार्दासाठी जात असतात. देश-परदेशातून भाविक साईबाबांच्या भेटीसाठी येत असतात. त्यामुळे अनेकजण खुल्या हाताने मंदिरात दान करत असतात. आज मधान्ह आरतीला हैदराबाद येथील डॉ.रामकृष्ण मांबा आणि रत्ना आंबा यांच्या परिवाराने श्री साई समाधीचे दर्शन घेतले आणि १९९२ साली केलेल्या नवसाची फेड म्हणून ४०लाख रुपयांची ७४२ ग्रॅम वजनाचा मुकूट दान केला.

- Advertisement -

दरम्यान, दरवर्षी नवस फेडण्यासाठी अनेक भाविक सोन्या-चांदीच्या वस्तू दान करत असतात. मनोकामना पूर्ण होत असल्याने भाविक आपला नवस फेडत असतात. कोरोना काळानंतर साईबाबा मंदिर सुरू झाल्यानंतर गर्दीचा ओघ वाढला होता. आताही नियमित गर्दी होत असून भाविकांकडून लाखोंचे दान केले जाते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -