केंद्र सरकारचा अतिमहत्त्वकांक्षी हायपरलूप प्रकल्प बारगळला? नव्या प्रकल्पाची बांधणी सुरू

या मार्गावर आता मुंबई-पुणे-हैदराबाद रेल्वे प्रकल्प तयार करण्यात येणार असल्याने हायपरलूप प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आल्याची चर्चा आहे.

hyperloop project

मुंबई-पुणे मार्गावरील केंद्र सरकारचा अतिमहत्त्वकांक्षी हायपर लूप प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणेमधील अंतर कमी होणार होते. मात्र, या मार्गावर आता मुंबई-पुणे-हैदराबाद रेल्वे प्रकल्प तयार करण्यात येणार असल्याने हायपरलूप प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आल्याची चर्चा आहे. (Hyperloop Project cancelled for new mumbai-pune-banglore railway project)

हेही वाचा– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट, मंत्रिमंडळात मनसेला जागा मिळणार?

मुंबई-पुणे हा तीन तासांचा प्रवास हायपरलूप प्रकल्पामुळे अवघ्या ३५ मिनिटांवर येणार होता. तसंच, हा प्रकल्प जगभरातील पहिला प्रकल्प होता. त्यामुळे या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या सहाय्याने हाती घेतला होता. तत्कालीन देवेंद्र फडणीवस सरकारनेही याला मंजुरी दिली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला विरोध केला. जगात कुठेही हा प्रकल्प यशस्वी झाल्यास येथे हा प्रकल्प उभारणीचा विचार करू असं म्हणत हा प्रकल्प गुंडाळण्यात आला होता.

हेही वाचा – … तर वेळ पडल्यास पवारांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन: केसरकरांची भूमिका

दरम्यान, आता याच मार्गावर मुंबई-पुणे-हैद्राबाद प्रकल्प उभारला जाणार आहे. भारतीय हायस्पीड रेल्वे कॉपोरेशन लिमिटेडने यासाठी आठ जागा निश्चित केल्या आहेत. या मार्गांवरून २५० ते ३२० किमी वेगाने ही ट्रेन या मार्गावर धावणार आहे. बुलेट ट्रेनसाठी स्वतंत्र मार्गही बांधले जाणार आहे. हा प्रकल्प पीएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखड्यातही दाखवण्यात आला असून हायपरलूप प्रकल्पाचा ७५ टक्के मार्ग हा याच ठिकाणावर आहे.