मीसुद्धा आईला भेटायला येतो पण फोटो काढत नाही, अजित पवारांचा मोदींना टोला

Next year pandharpur Vitthalas official Mahapuja by Ajit Pawar ncp mla amol mitkari claim

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. परंतु बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मीसुद्धा आईला भेटायला येतो पण फोटो काढत नाही, असा टोला अजित पवारांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.

अजित पवारांनी आज एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले की, मला काठेवाडीवरून मुंबई्ला पाठवलं. गेलो ना तिथे, राहतोय ना तिथे. कधी म्हटलंय का मला राहायचं आहे. मी सुद्धा आईला बारामतीला भेटायला येतो पण फोटो काढत नाही. भेट घेतो आणि जातो, असं अजित पवारांनी म्हटलंय.

उपस्थितांना संबोधित करताना अजित पवारांनी राज्य सरकारने केलेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरही अजित पवारांनी टीका केली. त्यांचा रोख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाकडे होता. एक जिल्हा सांभाळताना मला नाकी नऊ येत होती. तर सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद घेणारे काम कसं करणार?, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित करत फडणवीसांना टोला लगावला.

जी जनता आपल्यावर जबाबदारी देईल आणि आपले वरिष्ठ देतील. त्यापद्धतीनेच तुम्हाला आणि मला वागावं लागेल, असं अजित पवार म्हणाले.


हेही वाचा : नाशिकच्या संवेदनशील डीआरडीओ परिसरात ड्रोन दिसल्याने खळबळ, आडगाव पोलिसांत गुन्हा