घरमहाराष्ट्रमी भविष्यातही अपक्षच राहणार; डॉ. सत्यजित तांबे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम

मी भविष्यातही अपक्षच राहणार; डॉ. सत्यजित तांबे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम

Subscribe

नाशिकः मला अनेक संस्था, संघटनांनी मदत केली आहे. मला मदत करणारे काही जण असे आहेत ज्यांची नावे मी घेतली तर ते अडचणीत येतील. मात्र मला सर्व संघटना व संस्थानी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भविष्यातही मी अपक्ष म्हणूनच राहणार, असे नाशिक शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे विजयी उमेदवार डॉ. सत्यजित तांबे यांनी शनिवारी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ही निवडणूक मला कॉंग्रेस पक्षातूनच लढवायची होती. मी राष्ट्रीय कॉंग्रेसमधूनच उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र ए बी फार्म कॉंग्रेस पक्षाचा भरला नसल्याने गोंधळ झाला. मला पाठिंबा द्यावा यासाठी मी संजय राऊ यांच्याशी बोललो. अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क केला. आदित्य ठाकरे यांच्याशी बोललो. कॉंग्रेसमधील नेत्यांशी बोललो. मला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवायची होती. तरीही महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार जाहिर केला.

- Advertisement -

तरीही निवडणुकीत मला सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. ठाकरे गट, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, आरपीआय गट अशा सर्वांनीच मला मदत केली. भाजपने तर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास सांगितले. त्यानुसार मला स्थानिक पातळीवर भाजपने मदत केली. आमची निष्ठी व आमचे काम बघूनच सर्व पक्षांनी मला मदत केली. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. ही माझी शेवटची पत्रकार परिषद असणार आहे. मी याविषयावर पुन्हा कधीही बोलणार नाही. कारण मला काम करायचे आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे, असे डॉ. सत्यजित तांबे यांनी सांगितले.

ते म्हणाले. मी गेली २२ वर्षे पक्षाचे काम करत आहे. माझ्यावर ५० पेक्षा अधिक केसेस होते. माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. गेल्यावर्षी गुन्हे मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानंतर मला पासपोर्ट मिळाला आहे.

- Advertisement -

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नाशिक मतदारसंघामुळे अधिक चर्चेत राहिली होती. डॉ. सत्यजित तांबे हे विजयानंतर काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. मात्र मी अपक्षच राहणार असल्याचे डॉ. तांबे यांनी स्पष्ट केले.

 

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -