घरमहाराष्ट्र...तर मी शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडायला तयार, उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना आवाहन

…तर मी शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडायला तयार, उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना आवाहन

Subscribe

मी शिवसेनेचे नेतृत्व करायला लायक नसेल तर मी दोन्ही पद सोडायला तयार आहे, पण त्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे, असंही उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सांगितलं.

मुंबईः मला कोविड झालाय, मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकटाला सामोरा जाणारा शिवसैनिक आहे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी असल्याचंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

एक कुऱ्हाडीची गोष्ट सांगतो. एका झाडाला लाकूडतोड्यानं ज्याने घाव घातले त्या कुऱ्हाडीचं लाकूडही त्याच झाडाचं आहे. त्यामुळे त्याच्या वेदना अधिक आहेत. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नये, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. मी आज राजीनाम्याचे पत्र तयार करुन ठेवतो, जे गायब आहेत त्यांनी माझे पत्र घ्यावे. मी पुन्हा एकदा सांगतो हा अगतिकपणा नाही, लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

- Advertisement -

मी आव्हानाला सामोरं जाणारा माणूस आहे, पाठ दाखवणारा नाही.ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही, त्यांच्यासाठीही माझ्याकडे उत्तर आहे. मी शिवसेनेचे नेृत्वत्व करायला लायक नसेल तर मी दोन्ही पद सोडायला तयार आहे, पण त्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मना आनंद आहे, दुसऱ्या पक्षाचा होणार असेल तर तसं नको, समोर या आणि सांगा, असंही उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सांगितलं आहे.

जे आमदार गेले त्यांनी येऊन माझा राजीनामा घ्यावा आणि तो राज्यपालांना द्यावा. मी राजीनामा घेऊन जाऊ शकत नाही. कारण मला कोरोना झाला आहे. ज्या शिवसैनिकाला वाटते मी पक्षप्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून नालायक आहे तर मी दोन्ही पदे सोडतो. पण मी मुख्यमंत्रिपद सोडले तर शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला हवा. पण मला येऊन बोला किंवा तिकडून फोन करून बोला. तुम्ही मला स्पष्टपणे सांगा की, तुम्हाला नको तर मी पद सोडेन. हे माझे नाटक नाही, असंही उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना म्हटलंय.

- Advertisement -

शिवसेना कधीही हिंदुत्वापासून दूर जाऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे असे म्हटले होते. पण आता असे अनेक जण म्हणतात की आताची शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही. मी असे काय केले की शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचाः मी मुख्यमंत्री पद सोडेन पण…, उद्धव ठाकरे यांनी मांडली भूमिका

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -