घरमहाराष्ट्रमी वादळाची लेक...; भाजपात नाराज असल्याच्या चर्चेबाबत पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

मी वादळाची लेक…; भाजपात नाराज असल्याच्या चर्चेबाबत पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

Subscribe

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, धनंजय मुंडे, रोहिणी खडसे यांनी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहेबांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले. यानंतर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी मी वादळाची लेक म्हणत भाजपावर नाराज असल्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. (I am the daughter of the storm, Pankaja Munde’s reaction to the talk of being upset with BJP)

पंकजा मुंडे म्हणाल्या की, आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. या दिवशी मला राजकारण शून्य दिसतो. इथे जे लोक आले आहेत, त्यांना मी काही दिले नाही. मी यावेळी कोणत्याही राजकारण्यांना निमंत्रित केलेले नाही. कोणत्याही मोठ्या नेत्यांला बोलावले नाही. मी फक्त भजन किर्तन आणि मुंडेवर निष्पाप प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम ठेवला आहे. त्या नात्यांने नाथाभाऊ (एकनाथ खडसे) याठिकाणी आले आहेत. ते कोविडमध्ये येऊ शकले नव्हते, मध्यंतरी त्यांच्यावर ऑपरेशन झाले. त्यामुळे ते आज धनंजय मुंडे यांच्यासोबत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आले. गोपीनाथ गडावर मुंडेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येण्याचा अधिकार आहे. एकनाथ खडसे मुंडे साहेबांचे सहकारी होते, त्यामुळे तेही दर्शनासाठी आले. त्याच्याबरोबर कोणतेही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

- Advertisement -

भाषणाचं पोस्टमार्टम करण्याला बातमी म्हणत नाही
दोन दिवसांपूर्वींच्या भाषणावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझं कधीही एक भाषण दुसऱ्या भाषणासारखं नसतं. एखादी व्यक्ती जेव्हा एखादं वक्तव्य करतो तेव्हा तो व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन बोलतो. पण जर एखादा व्यक्ती समोरच्या व्यक्तींसमोर एका भाषणात बोलत असतो, त्या भाषणाचं पोस्टमार्टम करण्याला बातमी म्हणत नाही. त्यामुळे मला जे काही त्या भाषणाबद्दल बोलायचे आहे ते मी आज दुपारी 3 वाजता बोलणार आहे. त्याचं तुम्ही पोस्टमार्टम करणार, याची मला सवय झाली आहे. पण ते तुमचं प्रेम समजून मी स्विकारते.

मी वादळाची लेक
दुपारच्या भाषणात काय बोलणार असे विचारले असता ते मलाच माहीत नाही. माझ्याकडे कधी कागद नसतो, कधी चिट्टी नसेत. गोपीनाथ मुंडे यांचे वादळी जीवन होत आणि मी वादळाची लेक आहे. माझ्या भाषणानंतर येणाऱ्या वादळाची मी दिशा बदलली आहे, असे वक्तव्य करत पंकजा मुंडे भाजपामध्ये नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -