घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र‘भुसेंना पालकमंत्रीपद देण्यास मीच सांगितले’ : महाजन

‘भुसेंना पालकमंत्रीपद देण्यास मीच सांगितले’ : महाजन

Subscribe

नाशिक : जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर दादा भुसे यांनी महाजनांना धक्का देत बाजी मारल्याचे बोलले जात आहे. मात्र बाजी वगैरे काही नाही, मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगून भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद द्या असे सांगितले, असे स्पष्टीकरण ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना दिले.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहेत. त्यानुसार नाशिकच्या पालकमंत्रीपदी दादा भुसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी एकीकडे मंत्री गिरीश महाजन यांचे नाव सुरवातीपासून चर्चेत होते. त्यानंतर दादा भुसे यांचे नाव जोडले गेले. तर स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान महाजन यांना गेल्यामुळे अप्रत्यक्षपणे महाजनांकडेच नाशिकची धुरा सोपवली जाईल, असे संकेत प्राप्त झाले होते. त्यानंतर महाजनच नाशिकचे पालकमंत्री म्हणून नाशिककरांमध्ये समज झाली होती. मात्र, मंत्री दादा भुसे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी देण्यात शिंदे गटाने बाजी मारल्याचे बोलले जाते याबाबत प्रथमच गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महाजन म्हणाले, माझ्याकडे लातूर, नांदेड, धुळयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय माझ्या खात्यांचीही मोठी जबाबदारी माझ्यावर आहे.

- Advertisement -

याच कामातून मला वेळ मिळत नाहीये. आता या जिल्हयामध्ये जाऊन बैठका घ्यायच्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून डीपीडीसीची कामे खोळंबली आहेत ही कामे पुन्हा सुरू करायची आहे. पालकमंत्री ही व्यवस्था असते त्यामुळे मला कोणत्या जिल्हयाची जबाबदारी दिली काय न दिली काय याचा कामावर फरक पडत नसतो. दादांचा नाशिकसाठी आग्रह होता. शेवटी उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनीही माझयाशी चर्चा केली. शेवटी मीच दादांना नाशिकची जबाबदारी देऊन टाकण्यास सांगितले. याउलट पक्षाच्या दृष्टीने अडचणीचे असणार्‍या या या जिल्हयांमध्ये काम करण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर आहे त्यानूसार मी काम करेल. आगामी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी मी पूर्णवेळ काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -