घरमहाराष्ट्रसाडेचार वर्षांत मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो, 'या' भूमीत खास वैशिष्ट्ये- रामनाथ...

साडेचार वर्षांत मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो, ‘या’ भूमीत खास वैशिष्ट्ये- रामनाथ कोविंद

Subscribe

महाराष्ट्र आध्यात्मिक भूमी आहे तसेच अन्यायाविरुद्ध शौर्याने लढणारी आहे. देशभक्तांची भूमी आहे तसेच भागवत भक्तांची भूमी आहे. महाराष्ट्र राज्य देशाचे प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. यावेळच्या दौऱ्यात माझ्या मनात शून्यतेची भावना निर्माण झाली, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईः महाराष्ट्राची जनता आणि या भूमीचे नक्कीच खास वैशिष्ट्ये जे मला वारंवार याठिकाणी खेचून आणते. गेल्या साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा ज्योतीबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांसारख्या अनेक महान व्यक्तींमध्ये राज्याच्या महानतेचा विशाल प्रवाह दिसून येतो, असंही राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणालेत. मुंबईतल्या राजभवनातील दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

जर महाराष्ट्राच्या जनतेला राज्याच्या नावाची उत्पत्ती किंवा अर्थ विचारला तर भाषाशास्त्र किंवा इतिहासाच्या संदर्भाची आवश्यकता नाही. थेट तुमच्या ह्रदयातून उत्तर द्याल. आमचा महाराष्ट्र म्हणजेच भारतातील एक महान राज्य, असंही रामनाथ कोविंद म्हणालेत. महाराष्ट्र आध्यात्मिक भूमी आहे तसेच अन्यायाविरुद्ध शौर्याने लढणारी आहे. देशभक्तांची भूमी आहे तसेच भागवत भक्तांची भूमी आहे. महाराष्ट्र राज्य देशाचे प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. यावेळच्या दौऱ्यात माझ्या मनात शून्यतेची भावना निर्माण झाली, असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात आपल्या प्रिय लतादीदी यांचे निधन झाले. त्यांच्यासारखी महान प्रतिभा शतकात एकदाच जन्म घेत असते. अजिंठा-वेरुळ लेण्यांतील कला असेल वा पश्चिम घाटाचे नैसर्गिक सौंदर्य. महाराष्ट्राला प्रतिभा आणि निसर्गाचे वरदान लाभले आहे. येथील आदरातिथ्य प्रसिद्ध आहे. यामुळे केवळ मलाच नाही तर देश-विदेशातील असंख्य लोकांना पुन्हा-पुन्हा महाराष्ट्रात यावे वाटते. लतादीदींचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे, अशी भावनाही रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राची जनता आणि या भूमीचे नक्कीच खास वैशिष्ट्ये जे मला वारंवार याठिकाणी खेचून आणते. गेल्या साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा ज्योतीबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांसारख्या अनेक महान व्यक्तींमध्ये राज्याच्या महानतेचा विशाल प्रवाह दिसून येतो, असंही ते म्हणालेत. या कार्यक्रमात प्रमुख पाहण्यांची उपस्थिती आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण तसेच महाराष्ट्रातील जनतेचे आभार व्यक्त करतो, असंही राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणालेत.

- Advertisement -

हेही वाचाः …तेव्हा आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, पण रोज नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -