घरताज्या घडामोडीमला हार्ट अटॅक आलाच नाही, बळजबरीने इंजेक्शन टोचलं; नितीन देशमुखांनी सांगितली आपबिती

मला हार्ट अटॅक आलाच नाही, बळजबरीने इंजेक्शन टोचलं; नितीन देशमुखांनी सांगितली आपबिती

Subscribe

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते असल्याचा दावा केला जातोय. मात्र, शिंदेंनी आमदारांना फसवून सूरतला नेले असल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान, अकोल्याच्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या सुटकेची आपबिती सांगितली आहे. त्यांना हार्ट अटॅक आलाच नव्हता, मात्र तरीही २०-२५ जणांनी त्यांना पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे. तसेच, काल उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी आपली सुटका कशा पद्धतीने झाली, याचा थरारक प्रसंगही मुख्यमंत्र्यांसमोर कथन केला. (I did not have a heart attack, I was forcibly injected; Nitin Deshmukh expressed his displeasure)

हेही वाचा मोठी बातमी! ठाकरे सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरे राजीनामा देणार?

- Advertisement -

आमदार नितीन देशमुख म्हणाले की, ‘माझा रक्तदाब वाढला नव्हता. पण मला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर २०-२५ जणांनी पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन काय होतं माहिती नाही.’

ते पुढे म्हणाले की, ‘मी रात्री १२ वाजता हॉटेलमधून निघालो. रात्री तीन वाजता रस्त्यावर उभा होतो. माझ्यापाठी २०० पोलीस होते. पण मला कोणी लिफ्ट दिली नाही. त्यानंतर पोलिसांनी मला रुग्णालयात नेलं आणि मला हार्टअटॅक आल्याचा बनाव रचला. अटॅकचं कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.’

- Advertisement -

मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी मंत्र्यांसोबत गेलो होतो पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसेैनिक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या राजकारणात कोरोनानाट्य, राज्यपालांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण

संजय राऊतांचा दावा ठरला खरा

दरम्यान, नितीन राऊत यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येताच संजय राऊतांनी खुलासा केला होता. सूरतच्या हॉटेलमधून निघत असताना नितीन देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यांचं अपहरण करण्यात आलं असून त्यांनी सोमवारी रात्री स्वतःची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न केला असता गुजरात पोलिसांनी आणि गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली.

बायकोने कालच केली होती तक्रार

तसेच, नितीन देशमुख सूरतला गेले असताना त्यांच्या पत्नींने स्थानिक पोलीस ठाण्यात ते बेपत्का झाले असल्याची तक्रारही केली होती. कालपासून माझे पती बेपत्ता आहेत. त्यांना लवकर शोधावे, असे प्रांजल देशमुख यांनी तक्रारीत म्हटले होते.

नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. तसेच, त्यांचे देशमुख यांचे भाजपच्या नेत्यांसोबतही सलोख्याचे संबंध आहेत. मागील विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना पराभूत करण्यासाठी आमदार देशमुख यांनी भाजपला मदत केली, असा आरोप शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी केला होता. मात्र, सध्याची त्यांनी सांगितलेली परिस्थिती पाहता  नितीन देशमुख यांना खरच या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -