Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ...म्हणून राजकारणात मुलांनी येऊ नये अशी माझी इच्छा होती; नारायण राणेंचा खुलासा

…म्हणून राजकारणात मुलांनी येऊ नये अशी माझी इच्छा होती; नारायण राणेंचा खुलासा

Subscribe

नारायण राणे म्हणाले की, निलेश आणि नितेश ही दोन्ही मुलं शिक्षण घेत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश करु नये, असंच मला वाटत होतं. ते ओघाओघाने राजकारणात आले. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राज्याच्या राजकारणातील एक यशस्वी नावं असलं तरी आपल्या मुलांनी मात्र राजकारणात येऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या महाकट्टा या कार्यक्रमात संवाद साधत असताना त्यांनी हा खुलासा केला आहे. ( I dont want that my son’s Nilesh And nitesh would be in Politics
Narayan Rane s disclosure )

नारायण राणे म्हणाले की, निलेश आणि नितेश ही दोन्ही मुलं शिक्षण घेत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश करु नये, असंच मला वाटत होतं. ते ओघाओघाने राजकारणात आले.  त्यांनी शिक्षण पूर्ण करुन आपला व्यवसाय सांभाळावा, असं वाटतं होतं. दोन्ही मुलं कर्तृत्ववान व्हावी, अशी अपेक्षा होती. त्यांनी व्यवसाय, राजकारणात यश मिळवलं असे कौतुकोद्वगार नारायण राणेंनी काढले.

- Advertisement -

राजकारणात निष्ठा, काम पाहून पदे-जबाबदारी दिली जात नाही. राजकारण बदलत चाललं आहे. राजकारणात मी बरचं काही सहन केलं आणि पचवलं आहे. मात्र, मुलांच्या वाटेला हे येऊ नये यासाठी त्यांनी राजकारणापेक्षा व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे असे वाटत होते असेही नारायण राणे यांनी सांगितले.

2006 पर्यंत लंडनमध्येच होतो, त्यामुळे मला राजकारणात यायची इच्छा नव्हती. मी धाडस करुन आईला प्रश्न केला की मला लंडनमध्येच राहणे शक्य आहे का? पण अर्धाच विसा घरातून मिळाला पूर्ण मिळू शकला नाही. त्यामुळे, लंडनहून मुंबईला यावं लागलं. मी मुंबईत आलो तेव्हा वडिलांनी शिवसेना सोडली होती, त्यामुळे त्यांच्यासोबत असणं गरजेचं होतं. त्यातूनच, परिस्थितीनुरुप मी राजकारणात येत गेलो. महाराष्ट्रात फिरलो आणि पहिली निवडणूक लढवली, असं नितेश राणे यांनी सांगितलं.

- Advertisement -

( हेही वाचा: “देशभरात भाजपची घसरण सुरू”, शरद पवारांचे मोठे विधान )

म्हणून राऊतांविरोधात वापरतो आक्रमक भाषा

संजय राऊत कोणाचीच इज्जत ठेवत नाही, मग आम्हीदेखील त्यांची इज्जत का ठेवावी असा उलट सवालही राणे यांनी केला. आम्ही इतर कोणाला काही बोलत नाही. फक्त राऊतांविरोधात आक्रमक का बोलतो, याचा विचार करा, असं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisment -