Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मला माहेरी आल्यासारखं वाटतंय, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आशाताई भारावल्या

मला माहेरी आल्यासारखं वाटतंय, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आशाताई भारावल्या

Subscribe

मुंबई – गेली सात दशके संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आली की तिचं कौतुक होतं. तसं मला आज वाटतंय. मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि आज मला माहेरी आल्या सारखं वाटतंय, अशा शब्दांत आशाताई भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र शासनाकडून हा पुरस्कार स्वीकारताना त्या भारावल्या होत्या.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे काल, शुक्रवारी सायंकाळी गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना सन २०२१ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ख्यातनाम क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राज्याचे मुख्य सचिव मनुकमार श्रीवास्तव, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – गायिका आशाताई भोसले म्हणजे महाराष्ट्राची शान, मुख्यमंत्र्यांकडून कौतुकोद्गार

यावेळी अभिनेता सुमीत राघवन याने आशाताई भोसले यांना बोलते केले. त्यांना त्यांच्या पहिल्या गाण्याविषयी विचारण्यात आले. यावेळी त्या एकदम भूतकाळात रमल्या. कोल्हापुरात वयाच्या दहाव्या वर्षी 1943 साली मी पहिलं गाणं गायलं. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते, मी थरथर कापत होते. असं वाटलं की हा माईक घेऊन कोणीतरी जावं, मला पळून जावं असं वाटलं होतं. तरीही मी त्या वेळी गायलं. कारण पळून गेले असते तर घरच्यांनी मला मारलं असतं. 1946 साली मी हिंदी फिल्म लाईनमध्ये गायला सुरुवात केली. त्यानंतर आतापर्यंत 10 हजार गाणी गायली. संगीतप्रेमींनी माझं गाणं ऐकलंच नसतं तर मी येथपर्यंत आलेच नसते. असंच आपलं प्रेम राहू दे.” असं आशा भोसले म्हणाल्या.

- Advertisement -

मी फक्त मराठी नाही तर संपूर्ण भारतची कन्या आहे. माझे आईवडील, गुरु आणी दीदी यांचा मला आशीर्वाद आहे. म्हणून आज या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया महाराष्ट्र शासनाने मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे, असं पुरस्कार प्रदान झाल्यावर आशाताई म्हणाल्या.

हेही वाचा – PHOTO : ‘महाराष्ट्र भूषण’ आशा भोसले

- Advertisment -