घरCORONA UPDATEमला काँग्रेसची ऑफर होती - खडसे

मला काँग्रेसची ऑफर होती – खडसे

Subscribe

इतकेच नाही तर विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती.

विधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे इच्छुक असताना भाजपने त्यांचे नाव अचानक कापले यावरून आता खडसे चांगलेच दुखावले असून, त्यांनी आज भाजपच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती. भाजपच्या ६ ते ७ आमदारांनी देखील क्रॉस वोटिंग करण्याचे माझ्याकडे मान्य केले होते असा गौप्यस्फोटच त्यांनी यावेळी केला. पण मी काँग्रेसची ऑफर नाकारत काँग्रेसकडून उभं राहण्यास नकार दिला, असा दावा एकनाथ खडसेंनी केला. काही माध्यमाना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या निवड समितीने ज्या इच्छुकांच्या नावांच्या शिफारशी केल्या होत्या, त्यात आता ज्या चार जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यांची नावे नव्हती. त्यात माझ्यासह इतर तिघांची नावे होती. मात्र, निवड समितीने आमची नावे टाळून नव्या लोकांना उमेदवारी दिली. त्यावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. राज्यसभेच्या वेळी आम्हाला सांगण्यात आले होते की तुम्हाला आता नाही तर विधानपरिषदेवर संधी दिली जाईल. मात्र, आताही आमची नावे असताना आम्हाला संधी नाकारण्यात येऊन दगाफटका झाल्याचे खडसे म्हणालेत.

हा निष्ठावंतावर अन्याय

दरम्यान मला तिकीट नाकारली याचे दुःख नाही. पण पक्षात अनेक निष्ठावान असताना ज्यांनी पक्षाला शिव्या घातल्या, पक्षविरोधी कारवाया केल्या, अशा लोकांना संधी दिल्याने वाईट वाटले. हा एकप्रकारे निष्ठावंतांवर अन्याय असल्याचे ते म्हणालेत. एकनाथ खडसे यांच्यासह पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे हे माजी मंत्री देखील इच्छुक होते मात्र त्यांना देखील संधी मिळालेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -