घरमहाराष्ट्रपुणेRavindra Dhangekar : ...माझी पीएचडी झालीय; शिक्षणावरून टीका करणाऱ्या भाजपाला धंगेकरांचं प्रत्युत्तर

Ravindra Dhangekar : …माझी पीएचडी झालीय; शिक्षणावरून टीका करणाऱ्या भाजपाला धंगेकरांचं प्रत्युत्तर

Subscribe

पुणे : निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि महायुतीकडून मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार आहे. मात्र आता हा मतदारसंघ भाजपाच्या प्रचारामुळे चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवेळी ‘हू इज धंगेकर’ असा प्रचार भाजपाकडून करण्यात आला होता. यानंतर आता रवींद्र धंगेकरांना शिक्षणावरून ट्रोल करण्याचा भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र रवींद्र धंगेरकर यांनी भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (I have done my PhD Ravindra Dhangekars reply to BJP criticizing education)

हेही वाचा – Ramesh Baraskar : वंचितच्या दुसऱ्या यादीनंतर शरद पवार गटातून बारसकरांची हकालपट्टी; कारण काय?

- Advertisement -

शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं. याशिवाय हा मतदारसंघ राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी आहे. कसबा पोटनिवडणुकीवेळी भाजपाकडून हेमंत रासने आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी भाजपकडून ‘हू इज धंगेकर’ असा धंगेकरांविरुद्ध प्रचार करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही रवींद्र धंगेकर पोटनिवडणूक जिंकली होती. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढण्याची संधी दिली. तर भाजपाने मुरलीधर मोहोळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

कसबा पोटनिवडणुकीचा बदला घेण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपाने पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात मविआचा अशिक्षित उमेदवार असा प्रचार भाजपाकडून केला जात आहे. सोशल मीडियावर धंगेकरांच्या शिक्षणाविषयीचं एक प्रमाणपत्र व्हायरल करून ट्रोल केलं जातं आहे. मात्र आता रवींद्र धंगेकर यांनी भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Narendra Modi : …विरोधात बोलणाऱ्यांना नक्कीच पश्चात्ताप होईल; इलेक्टोरल बॉण्डवर काय म्हणाले पंतप्रधान?

काय म्हणाले धंगेकर?

कर्मवीर भाऊराव पाटील आणि वसंतदादा पाटलांचं शिक्षण काढणार का तुम्ही? असा सवाल करत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटले की, जनतेची नाळ आणि जनतेचा विकास यात माझी पीएचडी झाली आहे. जनतेला काय हवं ते मला कळतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. त्यांचं शिक्षण आठवी झालं. वसंतदादा पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण पहिल्यांदा महाराष्ट्रात आणलं. ते चौथी पास असल्याचं सर्व म्हणतात. जर तुम्हाला शिक्षणाचं एवढं ज्ञान आहे, तर मग राज्यातील 83 टक्के तरुण बेरोजगार का फिरताहेत? असा सवाल करत माझं शिक्षण काढणं हा विरोधकांचा दूधखुळापणा आहे. मागच्या वर्षी ‘हू इज धंगेकर’ हे लोकांना कळलं आणि त्यांनी दिलेलं मत हेच माझ्यासाठी ‘पीएचडी’ आहे. लोकांनी मला पीचडीचं सर्टिफिकेट कधीच देऊन ठेवलं आहे, असं सणसणीत प्रत्युत्तर रवींद्र धंगेकर यांनी दिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -