घरताज्या घडामोडीEVM vs मतपत्रिका : महाविकास आघाडीत मतभेद, अजित पवारांच्या 'त्या' विधानाची चर्चा

EVM vs मतपत्रिका : महाविकास आघाडीत मतभेद, अजित पवारांच्या ‘त्या’ विधानाची चर्चा

Subscribe

काँग्रेसने अनेकदा ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित केली आहे.

मतदान प्रक्रियेत मतदारांना ईव्हीएमसोबतच मतपत्रिकेचाही पर्याय मिळण्यासाठी कायदा करावा असे आदेश काही दिवसांपूर्वी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. त्यांच्या या आदेशामुळे ईव्हीएम (EVM) बाबत पुन्हा चर्चा सुरु झाली. काँग्रेसने अनेकदा ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएममध्ये फेरफार करून भारतीय जनता पक्ष (बीजेपी) निवडणुका जिंकत असल्याचा आरोप विरोधक करत असतात. मात्र, आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ईव्हीएम मशिनच्या वापराला पाठिंबा दर्शवला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा एखादा उमेदवाराचा जास्त मतांनी पराभूत झाल्यास विरोधी पक्ष हे ईव्हीएम मॅनेज केल्याचा आरोप करतात. मात्र, मला ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.

पक्ष जिंकतो तेव्हा सगळे ठीक

नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्ष असताना ईव्हीएमवर भाष्य केले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते काही बोलले नाहीत. त्यामुळे ही काँग्रेस पक्षाची भूमिका म्हणता येणार नाही. राजस्थान, पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आले आणि तिथे ईव्हीएम मशिनचा वापर करूनच मतदान करण्यात आले होते. जेव्हा पक्ष बहुमताने जिंकतो, तेव्हा सगळे काही ठीक असते. मात्र, ते पराभूत झाल्यावर ईव्हीएम मॅनेज केल्याचे आरोप होतात, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

नाना पटोले काय म्हणाले होते?

नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी ईव्हीएमवर भाष्य केले होते. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद ३२८ प्रमाणे राज्यातील निवडणुकांबाबत कायदा तयार करण्याचे अधिकार राज्य विधानमंडळाला आहेत. अनुच्छेद ३२८ नुसार राज्य विधानमंडळाला असलेल्या अधिकारानुसार कायदा तयार करुन राज्यातील जनतेला ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सूचना नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्ष असताना दिल्या होत्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -