घरताज्या घडामोडीबाबासाहेब पुरंदरेंवरील टीकेवर मी ठाम; डॉ. जयसिंगराव पवार यांचा खुलासा

बाबासाहेब पुरंदरेंवरील टीकेवर मी ठाम; डॉ. जयसिंगराव पवार यांचा खुलासा

Subscribe

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीत डॉ. पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेल्या सर्वच्या सर्व इतिहासाबाबत मी कधीही आक्षेप घेतलेला नाही. त्यांच्याकडून झालेल्या काही गोष्टींचा उल्लेख काय तो मी नाकारला, असे डॉ. पवार यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीत डॉ. पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेल्या सर्वच्या सर्व इतिहासाबाबत मी कधीही आक्षेप घेतलेला नाही. त्यांच्याकडून झालेल्या काही गोष्टींचा उल्लेख काय तो मी नाकारला, असे डॉ. पवार यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले. मात्र डॉ. पवार यांनी या वक्तव्याचे खंडन केले आहे. या बातम्यांमुळे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दस संभ्रम निर्माण झाला असल्याचे डॉ. पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान डॉ. जयसिंगराव पवार पत्राद्वारे हा खुलासा केला आहे. तसेच, त्याचे खुसाला करणारे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.

डॉ. जयसिंग पवार यांचा खुलासा

- Advertisement -

“राज ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये माझी भेट घेण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते माझ्या निवासस्थानी आले. तेव्हा इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटांतून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली. मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन मी आजच्या काळाच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. प्रबोधनकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री म्हणून आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल त्याचे मी स्वागत करेन, असे मी म्हणालो. माध्यमांमध्ये या विधानाची अतिशयोक्ती झाली. यावेळी त्यांच्याशी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काहीही चर्चा झाली नाही”

“राज ठाकरे निघून गेल्यावर पत्रकारांनी पुरंदरे यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर मी त्यांचा इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे वक्तव्य केलेले नाही. कारण आतापर्यंत लिखाणातून व संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली आहे आणि त्यावर आजही ठाम आहे. या बातम्यांमुळे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दस संभ्रम निर्माण होत आहे”

- Advertisement -

हेही वाचा – MCD Election: निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस, आप-भाजपमध्ये काँटे की टक्कर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -