घर ताज्या घडामोडी मी माझ्या आयुष्यात कधीच चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत - जयंत पाटील

मी माझ्या आयुष्यात कधीच चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत – जयंत पाटील

Subscribe

'तुमच्या आर्शिवादाने मी माझ्या आयुष्यात कधीच चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे ईडीच्या सर्व प्रश्नांना व्यवस्थित उत्तर दिली', असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईडी चौकशीनंतर बाहेर आल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले.

‘तुमच्या आर्शिवादाने मी माझ्या आयुष्यात कधीच चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे ईडीच्या सर्व प्रश्नांना व्यवस्थित उत्तर दिली’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईडी चौकशीनंतर बाहेर आल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. जयंत पाटील यांची दुपारी 12:15 वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. IL & FS प्रकरणी ईडी कार्यालयात जयंत पाटील यांनी आपला जबाब नोंदवला. (I have never done anything wrong in my life says Jayant Patil ncp mla)

नेमके काय म्हणाले जयंत पाटील?

- Advertisement -

“आपण सगळेजण याठिकाणी सकाळपासून थांबलेले आहात. पूर्ण दिवसभर येथे थांबलात. माझे, पक्षाचे आणि शरद पवारांचे समर्थन केले. ईडीच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तर दिली. त्यांचे समधान करून मी इथे आलोय. ईडीच्या अधिकाऱ्यांनाही मी चांगले सहकार्य केले. टायपिंग करून सेव्ह करायाला वेळ लागला. त्यामुळे मी पूस्तक वाचून काढलं. तुमच्या घोषणांचा आवाज मला वरपर्यंत येत होता. त्यामुळे आपण सर्व गेलात तरी चालेल. आगामी काळात आपण आणखी ताकदीने काम करू. टायपिंगमध्ये वेळ गेल्याने तुम्हाला इथे बसावे लागले”, असे जयंत पाटील म्हणाले.

“काही जण सकाळी साडे-पाच वाजल्यापासून ईडी कार्यालयाबाहेर होते. तुम्ही लांबचा प्रवास करून इथे आलात. त्याबद्दल तुमचे आभार. तुमच्या आर्शिवादाने मी माझ्या आयुष्यात कधीच चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे ईडीच्या सर्व प्रश्नांना व्यवस्थित उत्तर दिली. ईडीच्या चौकशीनंतर बाहेर येताना समजले की महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यातील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने निषेध मत नोंदवलं. भविष्यकाळात तुमचा असाच पाठिंबा, अशीच ताकद मिळत राहिल, असा विश्वास मी व्यक्त करतो”, असेही जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

तब्बल 9.30 तास चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज सकाळपासून ईडी चौकशी सुरु होती. तब्बल 9.30 तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर आले आहे. यावेळी ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. जयंत पाटील साधारण १२ वाजता ईडी कार्यालयात गेले होते. त्यानंतर रात्री ९.२५ वाजता ते कार्यालयातून बाहेर आले.


हेही वाचा – तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर

- Advertisment -