Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र 'मला तर आता उद्धव ठाकरेंची कीव येते'; 'त्या' व्यक्तव्याचा गिरीश महाजनांनी घेतला...

‘मला तर आता उद्धव ठाकरेंची कीव येते’; ‘त्या’ व्यक्तव्याचा गिरीश महाजनांनी घेतला समाचार

Subscribe

नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या जळगाव येथे झालेल्या सभेवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यावर सगळे लोक हसायला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल ते शेलक्या भाषेत आणि खालच्या भाषेत बोलायला लागले आहे आणि यामुळे त्यांच्याकडे फक्त दोन-चार लोक राहिले तो विषय वेगळा आहे. ज्यावेळेस फडणवीसांबद्दल उद्धव ठाकरे बोलत होते तेव्हा त्यांची मला कीव येत होती.

फस्ट्रेशन आल्याने ते असे बोलत आहे त्यांच्या मागे कोणी राहिले नाही म्हणून ते सध्या अस्वस्थ आहे आम्हाला त्यांचे शारीरिक व्यंग काढायचे नाही पंतप्रधानांवर त्यांनी काय बोलावे? त्यांचेच पंतप्रधान होण्याबाबत बॅनर लागले आहेत. आता विरोधी पक्षात आहे म्हणून त्यांना बोलावे लागते पण त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? माणसाच्या बोलण्यात विश्वासार्हता असायला पाहिजे ? मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले ? हे त्यांनी बघावे असा टोलाही त्यांनी लगावला.

त्यांच्या मनात काही काळेबरे नाही ना ?

- Advertisement -

संजय राऊत हे सध्या लोकांना उकवायला लागले आहेत त्यामुळे त्यांच्या मनात काही काळभेर नाही ना? असा संशय व्यक्त करत त्यांची चौकशी झाली पाहिजे असे ते म्हणाले. सध्याच्या काळात उद्धव ठाकरे अतिशय बालीश स्टेटमेंट करत आहे त्यामुळे त्यांनाच काही घडून तर आणायचे नाही ना? असेही ते म्हणाले. सातार्‍यातील पुसेसावळी गावातील दोन गटातील राड्याबदल बोलताना महाजन म्हणाले की, राज्यात कुणाला अस्थिरता माजवायची? कुणाला दंगली घडवायच्या आहेत ?याची चौकशी झाली पाहिजेजाणीवपूर्वक अस्थिरता कोण वाजवतंय ? कोण खतपाणी घालत आहे याचीही चौकशी पोलीस करत आहे

शरद पवार ते सत्य कसे नाकरू शकतात.

ही वस्तुस्थिती आहे, 2014 ते 2019 शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही का ? पवार साहेबांनी सांगितले होते तुम्ही काळजी करू नका आम्ही पाठीशी आहे. शिवसेना जेव्हा थोडी नाटक करायला लागली होती 2019 निवडणूक झाल्यावर त्यांनी चार चार वेळा दिल्लीत मिटींग केल्या होत्या. अजित दादा गेले आमची खेळी होती हे सांगितले, गुगली होती ते आमच्या सोबत होते, त्यांचा मानस होता परंतु त्यांनी आम्हाला गाफील ठेऊन खरी गुगली टाकली. घात करायचा ही त्यांची परंपरा आहे अजित पवार म्हणताय ते 100 टक्के खरं 2014 साली त्यांनीच उघड पाठिंबा दिला. त्यांनी सांगितले म्हणून तर आम्ही दावा केला होता. हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे . दिल्लीत जाऊन किती वेळा बैठका झाल्या. आमच्या नेत्यांसोबत त्यांनी मंत्रिपदाच्या पालकमंत्री पदाच्या वाटाघाटी केल्या आता काय ते नाही म्हणता अजित पवार म्हणताय ते खरे आहे. अजितपवार देखील त्या बैठकीला उपस्थित होते हे शरद पवार नाकारू शकत नाही. असे सांगत महाजन यांनी पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडवून दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -