घरताज्या घडामोडीमला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

केंद्र सरकारने लसीबाबत निर्णय जाहीर करावा

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वाढत्या कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे सर्व कामकाज पाहत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात असे म्हटले आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. परंतु या परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुठेही दिसत नाहीत तसेच जे काही करायचे आहे किंवा घोषणा करायची असते ते उपमुख्यमंत्री अजित पवारच करतात. असे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

कोरोना परिस्थिती भयावह झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीरची कमतरता निर्माण झाली आहे. परंतु राज्य सरकार रेमडेसिवीर इंजेक्शन आयात करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. राज्य सरकारला रेमडेसिवीर आयात करण्याचा अधिकार नाही मग अजित पवार कोणत्या अधिकाराने बोलत आहेत? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

तरच कोरोनाची चेन मोडता येईल

राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला आहे. परंतु कोरोनाची चेन लॉकडाऊनने तोडता येणार नाही. कोरोनाची चेन तोडण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. कोरोनाचा जो पहिला बाधित रुग्ण आहे तो किती जणांच्या संपर्कात आला आहे. तसेच ती व्यक्ती आणखी किती जणांच्या संपर्कात आली आहे. यावर ही यंत्रणा काम करेल तेव्हा कोरोनाची चेन तोडणे शक्य होईल असे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने लसीबाबत निर्णय जाहीर करावा

केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कोरोना लसीच्या किंमतीबाबत आठवड्याभरात निर्णय जाहीर करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल अस इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. सीरम इन्स्टिट्यूटने लसीची किंमत जाहीर केली आहे. यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकारआणि खासगी रुग्णालयांना कोरोना लसीचे वेगळे दर ठरवण्यात आले आहेत. सीरमने बाहेरील देशांना ३ ते ५ डॉलरमध्ये लस विकली आणि देशात १२०० रुपयांना लस उपलब्ध करत आहे. राज्यांनाही केंद्राप्रमाणे १५० रुपयाला लस मिळावी याबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -