Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Video : मला डॉक्टर होण्याची इच्छा होती, पण...- मुख्यमंत्री

Video : मला डॉक्टर होण्याची इच्छा होती, पण…- मुख्यमंत्री

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘सामना’ चे संपादक संजय राऊत यांनी एक विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी संजय राऊत यांनी ‘तुमचा कोरोनावर खूप अभ्यास आहे, इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांपेक्षा तुम्ही अभ्यासपूर्ण बोलता, WHO च्या एखद्या सदस्य बोलत आहे असं तुम्ही बोलता तेव्हा वाटतं’ असे विचारले असता. मला डॉक्टर होण्याची इच्छा होती असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे म्हणाले, लहानमुलांना नेहमी प्रश्न विचारला जायचा मोठेपणी कोण होणार. तेव्हा माझ्या मनात एक शक्यता डोकावत होती की डॉक्टर व्हावं. पण होमिओपॅथीचा मी अभ्यास करत होतो. त्यावेळी होमिओपॅथीचे डॉक्टरही उपचारासाठी आमच्या घरी येत होते. त्या काळात मी होमिओपॅथीचा अभ्यास करत होतो. काही वर्षांपूर्वी बीडमध्ये प्लेग आला होता. त्यावेळी तेथे शिवसेनेचं पथक पाठवलं होतं. औषधं कोणती लागतील तसेच मुंबईत पूर आला होता त्यावेळी सुद्धा कुठली औषधं लागतील या संदर्भात मी तळमळीने काम करत होतो. घरातही वातावरण तस होतं. त्यामुळे डॉक्टर होण्याची इच्छा होती. पण बरं झालं नाही झालो ते.

- Advertisement -

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -