Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'मी आंधळा, मुका, बहिरा होतो', मविआच्या 'त्या' बैठकीबाबत जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

‘मी आंधळा, मुका, बहिरा होतो’, मविआच्या ‘त्या’ बैठकीबाबत जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. बैठकांच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. अशातच राज्यातही आगामी लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा देखील सुरू झल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. बैठकांच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. अशातच राज्यातही आगामी लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा देखील सुरू झल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये महाविकास आघाडीची पुढची दिशा काय असेल? तिन्ही पक्षांच्या वज्रमूठ सभा कशा आणि कुठे होणार? तसेच, आगामी निवडणुकांबाबतही चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे. (I Was Blind Deaf And Mute In Maha Vikas Aghadi Meeting On Seat Sharing Formula Says Jitendra Awhad)

- Advertisement -

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी नुकताच झालेल्या एका बैठकीत लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत १६-१६-१६ जागांच्या फॉर्म्युलावर निवडणूक लढतील अशी चर्चा झाल्याचे समजते.

बैठकीतील या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभेचा काय फॉर्म्युला ठरला आहे असा प्रश्न आव्हाड यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना “मला काहीच माहिती नाही. मी त्या बैठकीत आंधळा, मुका बहिरा होतो”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करून भाजपासमोर तगडं आव्हान निर्माण केलं आहे. अशातच नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेससह मित्रपक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे.


हेही वाचा – खडकवासला धरणात २ मुलींच्या मृत्यूनंतर पर्यटकांसह स्थानिकांना बंदी; जलसंपदा विभागाच्या सूचना

- Advertisment -