घरताज्या घडामोडीदुसऱ्याला फाशी देताना, पहिल्यांदाच आयु्ष्यात आनंदी झालो - जल्लाद पवन

दुसऱ्याला फाशी देताना, पहिल्यांदाच आयु्ष्यात आनंदी झालो – जल्लाद पवन

Subscribe

आज पहाटेच चौघांना फासावर लटकवून मला अतिशय मसाधान वाटले. गेले अनेक दिवस मी या क्षणाची वाट पाहिली. तिहार जेल प्रशासनाने माझ्यावर ही जबाबदारी दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे. दोषींना फाशी देताना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आनंदी होतो अशी भावना निर्भया प्रकरणातील जल्लाद असलेल्या ५७ वर्षीय पवनने व्यक्त केली. अगदी कडक बंदोबस्तामध्ये पवनला तिहार जेलमधून उत्तर प्रदेशातून मेरठ येथे रवाना करण्यात आले. त्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली होती. निर्भया प्रकरणातील मुकेशकुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंग  चार आरोपींना आज पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. त्यासाठीची सगळी तयारी पवनने आणि तिहार जेल प्रशासनाने मध्यरात्रीपासूनच केली होती.

पवनने पहाटे ४ वाजता तिहार जेल गाठत फाशीआधीची सगळी तयारी पुर्ण केली. त्यासाठी तिहार जेल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गानेही मदत केली. तिहार जेल प्रशासनाने निर्भया हत्याकांडातील चौघा दोषींना फाशी देण्यासाठी पवनची निवड केली होती. उत्तर प्रदेशातला हा सर्टीफाईड असा एकमेव जल्लाद होता. मेरठ जेलमध्ये काम करणाऱ्या पवनला महिन्यापोटी ३ हजार रूपये मिळतात. आजोबा, वडिलांपाठोपाठच आता पवनही तिसऱ्या पिढीतल हे फाशी देण्याच काम करतो. लहानपणी त्याला कधीही वाटल नव्हत की मोठा होऊन त्यालाही हे काम कराव लागेल. त्याच्या वडिलांना आणि आजोबांना इंदिरा गांधीच्या दोषींना फाशी देण्याचे काम याआधी देण्यात आले होते. रंगा आणि बिल्ला यासारख्या गुन्हेगारांनाही पवनच्या वडिलांनी फाशी दिली होती. निठारी हत्याकांड प्रकरणातील सुरेंद्र कोली याची फाशी देण्यासाठी पवनची नेमणुक करण्यात आली होती. पण एनवेळी ही फाशी टळली.

- Advertisement -

हे ही वाचा – भारतात याआधीही चौघांना झाली होती फाशी, पुणे कनेक्शनचे देशातले एकमेव प्रकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -