मी धनुष्यबाण नव्हतं त्या मानसिकतेत -उद्धव ठाकरे

मी नव्याने सुरुवात करतोय. माझा सर्वसामान्य शिवसैनिक हेच माझे बळ आहे. हीच माझी दौलत आहे. मी १९ जून १९६६ च्या मानसिकतेचा आहे, तुम्ही तयार आहात का? तेव्हा धनुष्यबाण देखील नव्हतं, त्या मानसिकतेतून आपल्याला लढायचं आहे.

uddhav thackeray

मी नव्याने सुरुवात करतोय. माझा सर्वसामान्य शिवसैनिक हेच माझे बळ आहे. हीच माझी दौलत आहे. मी १९ जून १९६६ च्या मानसिकतेचा आहे, तुम्ही तयार आहात का? तेव्हा धनुष्यबाण देखील नव्हतं, त्या मानसिकतेतून आपल्याला लढायचं आहे. तुम्हाला बघून मला हत्तीपेक्षा हजारो वाघांचं बळ आलं आहे. जे गेले ते गेले. ते आपल्या सोबत कधीच नव्हते. हेच दिसते. आता खचायचे नाही. मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही या राजकारणाकडे लक्ष देऊ नका, त्याला तोंड द्यायला मी सज्ज आहे. तुम्ही निवडणुकांकडे लक्ष ठेवा. या निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत. तुम्हाला या गद्दारांच्या विरोधातील रागाचा निखारा फुलवायचा आहे. (I was not an archer in that mentality shiv sena chief Uddhav Thackeray slams new government of maharashtra)

कोणत्याही निवडणुका येऊ द्या यांना भुईसपाट करायचं आहे, असे भावूक उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी काढले. बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने संख्याबळाच्या जोरावर विधिमंडळातील गटनेतेपद आणि प्रतोदपद शिवसेनेकडून हिरावून घेतले आहे. पुढची लढाई ही विधिमंडळाबाहेरची असणार आहे. शिंदे गट शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हावरही दावा ठोकण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी तशी वेळ आलीच तर पक्षासाठी नव्याने सुरुवात करण्याची तयारीही ठेवल्याचे दिसत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संम्रभावस्थेत असलेल्या शिवसैनिकांना विश्वास देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यांनी मंगळवारी सेना भवनात राज्यातील महिला पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्वांना विश्वासात घेत त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपचा शिवसेना संपवण्याचा डाव आहे. शिवसैनिकांना शिवसैनिकांशी लढवायचे आहे. यांना शिवसेना नकोय. नुसती शिवसेना फोडा नाही तर शिवसेना संपवा हा त्यांचा डाव आहे, त्यासाठी हा दाढीवाला चेहरा पुढे केला. त्यांना देखील माहिती नाही आहे. त्यांना दाबून ठेवले आहे. त्यांचा गळा आवळून ठेवला आहे. ताबा त्यांच्या हातात आहे. काल बघितले ना समोरून माईक खेचला. मी मुख्यमंत्री असताना असे कधी झाले नाही, पण काल बघितले त्यांच्या पुढ्यातून माईक खेचला, त्यांना देखील कळाले नाही. आता माईक खेचलाय उद्या काय खेचतील ते बघा, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केली.

विधान परिषदमध्ये दोन्ही जागा जिंकून येतील असे म्हणत होते, आले देखील निवडून, पण १२ मते त्यांनी आधीच बाजूला काढून ठेवली होती. मग यांचे कपटकारस्थान कधीपासून सुरू होते, काल ते विधानसभेत गुपीत खुलले, उपमुख्यमंत्री त्यांना सांगत होते थांबा, थांबा, गाडीचा ब्रेक फेल झालेला, गाडी थांबते कशाला..रिक्षाचा ब्रेक फेल, त्यावेळेला तीन चाकी सरकार बोलायचे आता तीन चाकी चालवणारा त्यांचा ड्रायव्हर, आता चालवा सरकार, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘जे गेली २५ वर्ष मित्र होते ते आज कट्टर शत्रू झाले. पक्षाची धुरा ज्यांच्यावर सोपवली त्यांनी पाठीत वार केला. ही गोष्ट माझ्यासाठी शरमेची आणि लाजीरवाणी आहे. ज्यांच्या भरोशावर चाललो होतो त्यांनी दगा दिला’
-उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख