घरमहाराष्ट्र...मला घरी बसवण्यात आलं; दीपक सावंत यांनी शिंदेंसोबत जाण्यामागचं सांगितलं कारण

…मला घरी बसवण्यात आलं; दीपक सावंत यांनी शिंदेंसोबत जाण्यामागचं सांगितलं कारण

Subscribe

मुंबई : राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय दीपक सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज (१५ मार्च) शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना गेल्या दोन दिवसात दुसरा मोठा धक्का बसला आहे. याआधी माजी केंद्रीय मंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई याने शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.

शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर दीपक सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, पूर्वी शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एकत्र काम केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत माहीत असून त्यांनी कोरोना काळात सेंटर्स उभे करून नागरिकांसाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत आरोग्यासंबंधीत काम करता येईल म्हणून शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे दीपक सावंत यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, मला मंत्रीपद नको मला फक्त काम हवे होते. त्यामुळे मागील ३ वर्षांपासून मी काम मागत होतो. पण मला घरी का बसवले याचे कारण अजूनही मला माहीत नाही, असेही दीपक सावंत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – संतापजनक : शुल्लक कारणावरून १२वीच्या विद्यार्थ्याकडून आईची हत्या

दरम्यान, मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने दीपक सांवत यांना उमेदवारी नाकारून विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे जानेवारी २०१९ मध्ये डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी दीपक सावंत यांच्या कामाच्या पद्धतीवर शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये नाराजी असल्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती पुढे आली होती.

- Advertisement -

दुर्गम भागात शिवसेनेसाठी मोठे काम
आरोग्यमंत्री असताना दीपक सावंत यांनी सर्वसामान्य नागरिकांना सेवा दिल्या आहेत. तसेच त्यांनी दुर्गम भागात शिवसेनेसाठी मोठी कामे केली आहेत. कमी बोलणे आणि प्रसिद्धीपासून कायम दूर राहून जास्त काम करणे अशी त्यांची ओळख आहे. कोरोनासारख्या महामारीतही त्यांनी चांगले काम केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -