घरमहाराष्ट्रफलटणची उमेदवारी मीच नाकारली - दिपक निकाळजे

फलटणची उमेदवारी मीच नाकारली – दिपक निकाळजे

Subscribe

फलटणची विधानसभेची उमेदवारी मी मागितलीच नव्हती. त्यामुळे मला उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइ) चे उपाध्यक्ष दिपक निकाळजे यांनी घेतली आहे. याबाबत बोलताना निकाळजे म्हणाले की, छोटा राजन हा माझा भाऊ आहे. त्याचा मला अभिमान आहे. मात्र निवडणुकीच्या काळात हा मुद्दा वारंवार समोर आणणे ही खेदजनक बाब आहे. त्यामुळे २० वर्षाच्या राजकीय आणि सामजिक कारकिर्दीवर पडदा टाकण्याचा प्रय्तन आहे. असे सांगत निकाळजे यांच्या उमेदवारी वरून सुरू असलेल्या चर्चांवर स्वतः निकाळजे यांनीच पडदा टाकला आहे.

चेंबूर विधानसभेची मागणी 

महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून संपूर्ण राज्यात जरी मला जनता ओळखत असली तरी, माझे राजकिय व निवडणुकीसाठीचे कार्यक्षेत्र हे चेंबूर आहे. त्यामुळे चेंबूर विधानसभा मिळावी, अशी मागणी केली होती. परंतू चेंबूर विधानसभेत सध्या शिवसेनेचा आमदार असल्याने ही जागा महायुतीमध्ये आमच्या पक्षाला सुटली नाही. माझे गाव फलटणमध्ये असल्याने त्या ठिकाणाहून मी निवडणूक लढवावी, असे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सुचवले होते. मात्र एवढ्या कमी कालावधीत जाऊन जनाधार तयार करणे कठीण आहे. त्यामुळे मी स्वतःच ही उमेदवारी नाकारली होती, असे निकाळजे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

विशेष म्हणजे छोटा राजन हा माझा भाऊ आहे. आणि त्यामुळे मला तिकीट नाकरण्यात आले यात कुठलेही तथ्य नाही. याउलट मागील निवडणुकांच्या वेळी मी स्वतः मोदीजी आणि फडणवीसांच्या व्यासपिठावर होतो. मागील वीस वर्षापासून मी राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत आहे. पक्षाच्या आणि संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक कामंही केली असल्याचे दिपक निकाळजे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -