योगीही म्हणतात ‘मी पुन्हा येईन’, रेकॉर्ड तोडायलाच आलोय सांगत फडणवीसांच्या सुरात सूर

माझा ज्या प्रमाणे माझा ट्रेंड सुरु आहे त्यानुसार भाजप ३५० जागांपेक्षा एकही कमी जागा मिळणार नाहीत - योगी आदित्यनाथ

i will come again to break 35 year record in election said yogi adityanath
योगीही म्हणतात 'मी पुन्हा येईन', रेकॉर्ड तोडायलाच आलोय सांगत फडणवीसांच्या सुरात सूर

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा भाजपचेच सरकार येणार असल्याच्या विश्वास व्यक्त केला आहे. आपण रेकॉर्ड तोडण्यासाठी आलो असल्याचे योगींनी म्हटलं आहे. तर मी पुन्हा येईल असं म्हणत पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लक्षात घेता उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याची जाहीरातबाजी सुरु केली आहे. काही दिवसांपुर्वी योगी सरकारने आशा सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये ३०० च्या वर जागा जिंकणार असल्याचा विश्वास योगींना आहे.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. निवडणुकीचे वारे आतापासून वाहताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका मुलाखतीमध्ये मी पुन्हा येईन असे म्हणत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सुरात सुर मिसळला आहे. महाराष्ट्र विधानसभा २०१९ च्या निवडणुकीदरम्यान फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर मी पुन्हा विराजमान होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते. तसेच योगी आदित्यनाथ यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे.

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुलाखतीमध्ये उत्तर प्रदेशच्या राजकारणात ३५ वर्षांच्या काळात कोणताही मुख्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आला नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर योगींनी म्हटलं आहे की, मी पुन्हा येईन.. आम्ही रेकॉर्ड तोडायलाच आलो असल्याचे म्हटलं आहे. तसेच आगामी निवडणुकीत किती जागांवर भाजपला विजय मिळेल असं विचारण्यात आले असता, माझा ज्या प्रमाणे माझा ट्रेंड सुरु आहे त्यानुसार भाजप ३५० जागांपेक्षा एकही कमी जागा मिळणार नाहीत असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.

योगी सरकारची जोरदार तयारी

युपीतील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता योगी सरकारने जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. कोरोना काळात योगी सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यात येत आहे. अंगणवाडी कार्यकर्त्यांना मानधन आणि प्रोत्साहनपर भत्त म्हणून महिन्याला १५०० रुपये, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्यांना १२५० रुपये आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ७५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. योगी सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन ५५०० केले आहे. तर आशा सेविकांना ४००० मानधन करण्यात आले आहे. युपीतील तब्बल ३.७३ लाख अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्त्याचा फायदा होणार आहे. यासाठी योगी सरकारने २६५.७० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.


हेही वाचा : Time Magazine च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला