बाळासाहेबांनी दिलेलं वचन मी पूर्ण करणार, नामांतरावरून मुख्यमंत्र्यांचा औरंगाबादकरांना दिलासा

हे वचन मी पूर्ण करणार आहे. पण नावाला शोभेल असं शहर उभं करायचं आहे. नामांतरणाची सुरुवात म्हणून आधी विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीराजे करणार आहे. त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. 

औरंगाबाद – औरंगाबादचं नाव संभाजीनगर होणार का? नामांतरणावरून उद्धव ठाकरे काय भाषण करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यावरून बोलताना ठाकरे म्हणाले की, या शहराचं नामांतरण तर होणारच आहे, पण त्याआधी नावाला शोभेल असं शहर उभं करणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. (I will fulfill the promise given by Balasaheb, the Chief Minister assured Aurangabadkar about the renaming)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणार असं वचन बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं होतं. हे वचन मी अद्यापही विसरलेलो नाही. हे वचन मी पूर्ण करणार आहे. पण नावाला शोभेल असं शहर उभं करायचं आहे. नामांतरणाची सुरुवात म्हणून आधी विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीराजे करणार आहे. त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे.

भाषणाला सुरुवात होण्या आधी साऱ्यांचे लक्ष नामांतरणाच्या मुद्द्याकडे लागले होते. त्यांनी सरुवातीला जल आक्रोष मोर्च्यावरून विरोधकांवर निशाणा साधला. मात्र, त्यावरून संभाजीनगरच्या मुद्द्यावर येताच औरंगाबादकरांनी टाळ्या-शिट्ट्यांनी मुद्द्याचं स्वागत केलं. जसं काही या मुद्द्यावर अवघे औरंगाबादकर आतुरतेने वाट पाहत होते.

भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ता असताना कोणी लक्ष देत नाही. पण सत्ता गेली की यांच्या अंगात येतं. सत्तेतून बाहेर पडल्यावर यांनी औरंगाबादच्या नामांतरणावरून लक्ष्य करायला सुरुवात केली. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी वचन दिल्याप्रमाणे औरंगाबादचं नाव संभाजीनगर नक्की होणार. हे वचन मी पूर्ण करणार. पण त्याआधी विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीराजे करा, असा प्रस्ताव मी केंद्राकडे केला आहे. हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी भाजपाने केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना दिले.

दरम्यान, औरंगाबाद शहरात आधी रस्ते, पाण्याची कामं करून दाखवेन आणि नंतरच शहराचं नाव बदलेन असं उद्धव ठाकरे म्हणाले. शहराचं नुसतं नाव बदलून उपयोग नाही, ज्या संभाजी राजेंचं नाव शहराला द्यायचंय त्या शहराची बिकट अवस्था असेल तर त्यांना काय वाटेल, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.