घरमहाराष्ट्रमी जे बोलत होतो माफी मागणार नाही, ते बरोबर, त्यांनी जरूर हक्कभंग...

मी जे बोलत होतो माफी मागणार नाही, ते बरोबर, त्यांनी जरूर हक्कभंग आणावा, भास्कर जाधव आक्रमक

Subscribe

भास्कर जाधवांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिलीय. सन्माननीय अध्यक्ष महोदय मी माफी मागावी अशा प्रकारचा आग्रह हा विरोधी पक्षनेते आणि विरोधी सदस्यांकडून वारंवार होतोय. अशा प्रकारचे प्रसंग यापूर्वी या सभागृहात अनेक वेळा आले. त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करणं, माफी मागणं म्हणजे कोणी लहान होतं, असं नाही. ऊर्जा विभागाची लक्षवेधी या ठिकाणी सुरू होती.

मुंबईः विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी जोरदार गदारोळ झालाय. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अंगविक्षेप केल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झालेत. त्यानंतर भास्कर जाधवांनी संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केलीय.

भास्कर जाधवांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिलीय. सन्माननीय अध्यक्ष महोदय मी माफी मागावी अशा प्रकारचा आग्रह हा विरोधी पक्षनेते आणि विरोधी सदस्यांकडून वारंवार होतोय. अशा प्रकारचे प्रसंग यापूर्वी या सभागृहात अनेक वेळा आले. त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करणं, माफी मागणं म्हणजे कोणी लहान होतं, असं नाही. ऊर्जा विभागाची लक्षवेधी या ठिकाणी सुरू होती. त्याच वेळी या लक्षवेधीवर सुधीर मुनगंटीवार काही भाष्य करत होते. आपण तो सगळा रेकॉर्ड काढून बघा. ते भाष्य बघा त्यांना ऊर्जामंत्री नितीन राऊत उत्तर देत होते. उत्तर देत असताना त्यांनी सुधीर भाऊ आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानले. आपण हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलात आणि मला याचा खुलासा करण्याची संधी दिलीत. त्याच वेळी त्यांनी उल्लेख केला, देशाच्या पंतप्रधानांनी 50 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू असे म्हटले. त्याच वेळेला सभागृहाचे सदस्य देवेंद्र फडणवीस उठले आणि त्यांनी त्याच्यावर हरकत घेतली. त्यांची हरकत बरोबर होती, असंही भास्कर जाधव म्हणालेत.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले, माननीय पंतप्रधान 50 लाख रुपये कधी बोलले नाहीत, अशा प्रकारची त्यांची हरकत होती. पण त्याचबरोबर एकाच शाळेत आम्हीपण थोडे फार शिकलेलो आहोत. ते वरच्या वर्गात गेले असतील, मी खालच्या वर्गात आहे. त्यांनी थोडासा शब्दछल केला की, ते पंतप्रधान म्हणून बोलले नाहीत. याचा अर्थ मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी हे सर्व बोलले. प्रचाराच्या सभांमधून बोलले. काळा पैसा आल्यावर 15 लाख रुपये देऊ. अध्यक्ष महोदय आणि म्हणून त्यावेळी माननीय विरोधी पक्षनेते जे बोलले तेच मी बोललो. ते बोलताना मी अंगविक्षेप केला असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्याकडून थोडे हावभाव होतात तरीदेखील मी नक्कल केली असेल ती मागे घेतो. पण या सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालायचं असेल, मी पंतप्रधानांबद्दल काही बोलून सभागृहाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागतो. मी कुठलाही असंसदीय शब्द न वापरता आपण मला माफी मागायला सांगितलीत. पण दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांनी हक्कभंग आणणार असल्याचं सांगितलं. याचा अर्थ आहे. त्यांनी जरूर हक्कभंग आणावा मी सामोरे जायला तयार आहे, असंही भास्कर जाधवांनी सांगितलंय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -