घरमहाराष्ट्रटीका झाली तरी चालेल, पण लोकांना खोटा धीर देणार नाही - मुख्यमंत्री...

टीका झाली तरी चालेल, पण लोकांना खोटा धीर देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Subscribe

माझ्यावर टीका झाली तरी चालेल पण लोकांना धीर देण्यासाठी काहीही खोटं बोलणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यावर गेल्या काही महिन्यांत अनेक वादळं आली. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालं. यावरुन मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे आमदारांसाठी “राज्याचा अर्थसंकल्प-माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात” ही दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यात वादळामागून वादळं येत आहेत. त्यामुळे नुकसान होत आहे. प्रत्येकवेळी पंचनामे होतात. आपण त्याला नुकसान भरपाई म्हणतो. खरं तर ती तात्काळ मदत आहे. नुकसान भरपाई आपण करु शकत नाही कारण खूप मोठ नुकसान होतं ते कधीच भरुन काढू शकत नाही. मी खोटं बोलणार नाही. लोकांना धीर देताना काहीही बोलायचं नसतं. माझ्यावर टीका झाली तरी चालेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

सभागृहातील वागणुकीचं भान पाहिजे

सभागृहात जे बोलता ते केलं नाही तर लोक तुम्हाला घरी बसवतील. तुमची सभागृहातील वागणूक आणि संसदीय भाषा याचं भान असलं पाहिजे. पण आता उथळपणा अधिक असतो. कोणाच्या शिक्षणाचा प्रश्न नाही पण किमान नीट बोलता आलं पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

अर्थसंकल्प ठिपक्यांच्या रांगोळीसारखा

अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी आहे. ठिपके माझ्या महाराष्ट्रातील मतदारसंघ आहेत. ते मतदारसंघ एकत्र जोडले गेले आणि त्याच्यामध्ये आपण रंग भरले. तर त्या रांगोळीला अर्थ येतो. रांगोळीतील ठिपके जोडण्याचं काम निवडून आलेल्या आमदारांनी करायचं आहे. कारण ठिपका जोडला गेला तर माझं राज्य जोडलं जाणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

…आणि आज आपला वर्ग भरला

काल राज्यातील शाळेची घंटा वाजली आणि आज आपला वर्ग भरला. आपण सर्व विद्यार्थी आहोत. विद्यार्थी म्हटल्यावर थोडं मास्तर आणि हेडमास्तरांचं काम सभापती, उपसभापती यांना करावच लागणार. अर्थसंकल्प माझ्या मतदारसंघापुरता असा विषय असल्यामुळे यावर काय बोलायचं याची पंचाईत झाली आहे. कारण मी आहे विधानपरिषदेचा आणि मुख्यमंत्री…त्यामुळे माझा मतदारसंघ माझं राज्य. जर मी माझ्या राज्याचा विचार करणार नसेन आणि मी जिथे राहतो तेवढ्या पुरता अथवा एखाद्या विभागापुरता कोता विचर करणार असेन तर मग मी मुख्यमंत्री कसला? असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे अभिनंदन केलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -