नवी मुंबई मनपा आयुक्त पदावर अभिजित बांगर

नवी मुंबई मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली

ias abhijeet bangar

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करुन त्यांच्या जागी अभिजित बांगर यांना नवी मुंबईच्या आयुक्तपदी नेमण्यात आलं आहे. मिसाळ यांना कोरोनावर नियंत्रण आणता न आल्यामुळे बदली करण्यात आली आहे. १५ दिवसांपूर्वी मिसाल यांची बदली झाली होती. पण त्यांनी स्थगिती मिळवली होती. आता १५ दिवसातच पुन्हा बदली झाली आहे.


हेही वाचा – नवी मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आयुक्तांच्या बदल्या एकनाथ शिंदेंनी बसवले अजितदादांनी हटवले


नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत नवी मुंबईकरांमध्ये करोनाच्या काळात नाराजी होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या हट्टामुळे त्यावेळी मिसाळ यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती.