घरताज्या घडामोडीअखेर IAS आंचल गोएल परभणी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारणार

अखेर IAS आंचल गोएल परभणी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारणार

Subscribe

बुधवारी दुपारी स्विकारणार परभणी जिल्हाधिकारी म्हणून पदभार

परभणीतील आयएएस अधिकारी आंचल गोएल यांच्या नेमणुकीवरून गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा आणि तर्क वितर्क लावण्यात येत असतानाच अखेर आज मंगळवारी दुपारी या संपुर्ण प्रकरणावर पडदा पडला. अल्पसंख्याक मंत्री आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर या विषयाला पूर्णविराम मिळाला. नवाब मलिक यांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत परभणीच्या जिल्हाधिकारी पदावर आंचल गोएल यांचीच नेमणुक होईल असे त्यांनी स्पष्ट केले. अखेर आयएएस अधिकारी आंचल गोएल यांनी बुधवारी परभणी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांच्याकडे त्यांनी पदभार स्विकारत असल्याचे पत्र आज मंगळवारी दुपारी दिले. याआधी परभणी जिल्हाधिकारी पदाची दिलेली जबाबदारी ही आंचल गोएल यांच्याकडून काढून घेण्यात आली होती. तसा अध्यादेश काढतानाच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी दिली होती. त्यांची नियुक्ती रद्द करून मुंबईत बोलावल्यानेच नव्या वादाला तोंड फुटले होते.

अखेर आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत आंचल गोएल यांचीच परभणी जिल्हाधिकारी पदावर वर्णी लागणार असे स्पष्ट करण्यात आले. अतिशय कडक शिस्तीच्या म्हणून ओळख असलेल्या आंचल गोएल यांच्या नेमणुकीवर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळेच त्यांची नियुक्ती ही एनवेळी रद्द करण्यात आली. पण या प्रकरणातील बातम्या समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून पुन्हा एकदा जिल्हाधिकारी पदावर आंचल गोएल यांची नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यादिवशी त्या पदभार स्वीकारणार होत्या. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने त्यांना पदभार घेऊ नका असं सांगितलं. त्यानंतर ही नियुक्ती थांबवण्यात पालकमंत्र्यांची नावं आली होती, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला की आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी असतील. आंचल गोयल यांना रितसर तिथले अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यांना पदभार देतील, असं मलिक यांनी सांगितलं.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -