Homeमहाराष्ट्रIAS Ashwini Bhide : श्रीकर परदेशींनंतर आणखी एक बदली, अश्विनी भिडेंची CM...

IAS Ashwini Bhide : श्रीकर परदेशींनंतर आणखी एक बदली, अश्विनी भिडेंची CM कार्यालयात प्रधान सचिवपदी नियुक्ती

Subscribe

मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदाचा कार्यभार अधिकारी ब्रिजेश सिंहे यांच्याकडे आहे.

मुंबई : मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदाचा कार्यभार अधिकारी ब्रिजेश सिंहे यांच्याकडे आहे. परंतु, आता अश्विनी भिडे यांना त्वरीत या पदाचा कारभार हाती घेण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. (IAS Ashwini Bhide appointed as Principal Secretary in CM office)

IAS अधिकारी अश्विनी भिडे या ‘मेट्रो व्हूमन’ म्हणून ओळखल्या जातात. त्या आरेमधील झाडे मेट्रो कारशेडसाठी तोडल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. पण त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. परंतु, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आलेल्या युतीच्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदी नेमण्यात आले. ज्यानंतर भिडे यांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय बदलून मेट्रोची कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला. मेट्रो व्हूमन अश्विनी भिडे या कायमच मेट्रोच्या कामांसंदर्भातील माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

- Advertisement -

हेही वाचा… Atul Subhash Suicide : पत्नी निकिता सिंघानियासह तिची आई आणि भावाचा पोलिसांकडून शोध सुरू

आरे जंगलातील झाडे मेट्रो कारशेडसाठी तोडल्यामुळे अश्विनी भिडे यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यावेळी लोकांच्या टिकेला उत्तर देण्यासाठी त्यांनी #AareAikaNa ही मोहीम सुरू केली. त्यात त्यांनी ट्विटरवर आरेबाबत लोकांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले होते. कोर्टाने आरेला जंगल म्हणून घोषित करण्याची आणि सुप्रीम कोर्टात कारशेड कांजुरमार्गला बांधण्याबाबतची याचिका फेटाळल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली होती. तर एका ट्विटमध्ये त्या म्हणाल्या होत्या, कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. तरीदेखील काही लोक स्वत:ला कोर्टापेक्षा मोठे समजतात. त्यांच्या स्वत:च्या कारवाया अवैध आहेत तरीही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला होता. अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकारी असल्याचेही म्हटले जाते. त्यामुळे आताही त्यांती मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाल्याची चर्चा रंगली आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -