मुंबई : राज्यात पुन्हा एकदा 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्यांचे आदेश जारी केले. या आदेशानुसार, विविध विभाग आणि महामंडळांमधील महत्त्वाच्या पदांवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यावेळी आयएएस अधिकारी मनीषा आव्हाळे यांची आता उल्हासनगर महापालिकेत महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच, नुकतेच याआधीचे प्रकल्प संचालक डॉ. निपुण विनायक यांची बदली सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर आता या पदावर राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आयएएस पंकज कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (IAS Transfer 5 officers transferred Manisha Awhale appointed as Ulhasnagar Commissioner)
हेही वाचा : Sanjay Shirsat : संजय शिरसाटांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवले, शासन निर्णय जारी
सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी हे आदेश जारी केला आहेत. याआधी मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांची पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या जागी आयएएस किशोर तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आधी महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होते. तसेच, आयएएस नंदकुमार बेडसे यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस अनिता मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत.
उल्हासनगरच्या आयुक्तपदी या नावांची होती चर्चा
उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर या पदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे देण्यात आला होता. पण त्यानंतर गुरुवारी (16 जानेवारी) आयुक्तपदी पुणे सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली. पण याआधी काही नावांची चर्चा सुरू होत्या. उल्हासनगरच्या आयुक्तपदासाठी अंबरनाथ नगरपरिषदेचे प्रशासक डॉ प्रशांत रसाळ तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची नावे चर्चेत होती.