घरमहाराष्ट्रगरोदर महिला, नवजात बालकांसाठी ICMR, महाराष्ट्राची Pre Covid Registry

गरोदर महिला, नवजात बालकांसाठी ICMR, महाराष्ट्राची Pre Covid Registry

Subscribe

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकार या तिन्ही यंत्रणांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात महिला आणि बालकांसाठी Pre Covid Registry (प्री- कोव्हिड रजिस्ट्री) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संक्रमणाशी संबंधित महिलांच्या गरोदरपणाच्या काळात तसेच मुलांच्या आरोग्याच्या तक्रारीसाठी निवारणासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. विशेषतः गरोदर महिलांसाठीची अशी ही रजिस्ट्री असणार आहे. या रजिस्ट्रीच्या माध्यमातून SARS CoV-2 चा गरोदर महिलांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात येणार आहे. तसेच बाळांत महिला आणि नव्याने जन्माला येणाऱ्या बालकांवर कोरोनाचा नेमका काय परिणाम होतो हेदेखील अभ्यासण्यात येणार आहे.

- Advertisement -

जून २०२१ च्या आकडेवारीनुसार जवळपास ५५२४ गरोदर महिलांची आणि बाळांत महिलांची देशभरात नोंद ही प्री कोविड रजिस्ट्रीमध्ये झालेली आहे. एकुण २१ वैद्यकीय महाविद्यालये आणि रूग्णालये ही या अभ्यासाचा भाग आहेत. या अभ्यासामध्ये महिलेकडून बाळाला होणारा कोरोनाचा संसर्ग हाच मुख्य अभ्यासाचा विषय होता. मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकारने महिला आणि बालकांमधील कोरोनाच्या संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी सरशी घेतली आहे. त्याचाच भाग म्हणजे प्रीकोविड रजिस्ट्री तयार करणे हा एक भाग आहे.

या अभ्यासाचा भाग म्हणूनच एकुण अकरा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रबंध हे जरनलच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले. या संपुर्ण अभ्यासाचा महत्वाचा भाग म्हणजे कोरोनाच्या काळात गरोदर महिला आणि बालकांना होणारी कोरोनाची लागण हाच आहे. संपुर्ण कोरोनाच्या काळात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान गरोदर महिलांना होणारा कोरोनाची लागण हा महत्वाचा अभ्यासाचा विषय होता. दुसऱ्या लाटेच्या दरम्यान गरोदर महिलांसोबत नवजात बालकांनाही कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली होती. तसेच या बालकांनी कोरोनावर मात केल्याचीही उदाहरणे समोर आली होती.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -