घरताज्या घडामोडीCBSE पाठोपाठ ICSE बोर्डाची १० वी, १२ वीची परीक्षा पुढे ढकलली

CBSE पाठोपाठ ICSE बोर्डाची १० वी, १२ वीची परीक्षा पुढे ढकलली

Subscribe

जूनमध्ये परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार

देशात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने विचार करुन राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला यानंतर आता CBSE बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता ICSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा येत्या ४ मेला घेण्यात येणार होत्या त्या आता जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येतील.

ICSE बोर्डाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. ४ मे पासून या परीक्षा घेण्यात येणार होत्या त्या आता जूनमध्ये घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर NEETPG-२०२१ परीक्षा पुढे ढकलण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा १८ एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. या परीक्षेचेही जूनमध्ये सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच CBSE बोर्डाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या असून १०वीची परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात तर बारावीची जूनमध्ये घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -