घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023एकाही हिंदू मुलीवर अत्याचार होणार असेल तर..., लव्ह जिहादवरून सभागृहात खडाजंगी

एकाही हिंदू मुलीवर अत्याचार होणार असेल तर…, लव्ह जिहादवरून सभागृहात खडाजंगी

Subscribe

मुंबई – लव्ह जिहादप्रकरणी महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल सभागृहात मुद्दा मांडला होता. याप्रकरणी माहिती देताना त्यांनी राज्यात लव्ह जिहादची १ लाख प्रकरणे असल्याचा दावा केला होता. मात्र ही आकडेवारी चुकीची असल्याची माहिती आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाला दिली. त्यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी झाली. एवढंच नव्हे तर चुकीची माहिती दिल्याप्रकरणी मंगलप्रभात लोढा यांनी माफी मागावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली.

“मंगलप्रभात लोढा यांना कोणत्याही समाजाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या हे मान्य आहे. पण त्यांनी सभागृहाला माहिती देताना सांगितलं की लव्ह जिहादची एक लाख प्रकरणे आहेत. परंतु, माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार फक्त ३ हजार ६९३ लव्ह इंटरफेथची प्रकरणे आहेत. लव्ह इंटरफेथला हे लव्ह जिहाद म्हणतात. एका मंत्री महोदयाने चुकीची माहिती देऊन समाजात दुफळी निर्माण करू नये, रेकॉर्ड तपासला जावा,” अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी पॉइंट ऑफ प्रोसिजर मांडत केली. यावरून सभागृहात एकच गदारोळ झाला.

- Advertisement -

मंगलप्रभात लोढा यांनी कोणत्याही जाती-धर्माचा उल्लेख न करता लव्ह जिहाद आकडेवारी दिली होती. मग, जितेंद्र आव्हाडांनी त्यावर आक्षेप घेण्याचं कारण काय? असा सवाल उपस्थित करत मुंब्र्यातील मतांच्या लांगूलचालनासाठी तुम्ही हे बोलत आहात, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. ज्यांची मुलगी जाते त्या बापाला आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही असंही गुलाबराव पाटील म्हणाले. आशिष शेलार यांनीही जितेंद्र आव्हाडांना घेरण्याचा प्रयत्न केला.

“मंत्र्यांवर हेतुआरोप करायचे असतील तर जितेंद्र आव्हाडांनी त्यांना नोटीस पाठवावी,” असं आशिष शेलार म्हणाले. हिंदू मुलींवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांविरोधात कायदा आलाच पाहिजे, असंही आशिष शेलार म्हणाले. १ लाख काय, ३ हजार काय आणि एका हिंदू महिलेवर अत्याचार झाला, खून झाला तर आम्ही बोलणारच. हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं आशिष शेलार म्हणाले. आमची भूमिका आहे की एकाही महिलेवर, मुलीवर अन्याय अत्याचार झाला असेल, प्रेमप्रकरणातून खून झाला असेल तर आम्ही बोलणारच असं आशिष शेलार यांनी ठणकावून सांगितलं.

- Advertisement -

लोढा यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली. लोढा यांनी माफी मागितली पाहिजे. लव्ह जिहाद नावाचा कोणताही प्रकार नाही. धर्मावरून राजकारण करायचं आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -