घरमहाराष्ट्र'अजित पवार मुख्यमंत्री झाले तर...", सुप्रिया सुळेंचे मोठे विधान

‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर…”, सुप्रिया सुळेंचे मोठे विधान

Subscribe

नांदेड : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंड केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर अनेकदा अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचे म्हटल्यानंतर राजकीय चर्चांना पूर्ण विराम लागला. पण आजही अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर पहिला हार मी घालेन’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात अनेक नेत्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागत आहे. यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा दिवसानिमित्ताने असे बॅनर लागले होते. यात अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार रोहित पवार या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – “खोके सरकारला पक्ष फोडण्यासाठी दिल्लीत जायला वेळ, पण…”, सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका

शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेवर सरकारवर टीका

राज्यामध्ये सध्या आरोग्य आणि शैक्षणिकता वाढवण्याऐवजी सध्याचे शिंदे फडणवीस सरकारच्या राज्यामध्ये दारूचे दुकान जास्ती वाढत आहे. ही बाब महाराष्ट्राच्या संस्कृतीला पटण्यासारखी नाही आहे, असे सुप्रिया सुळे यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंतांचं सडेतोड उत्तर; मांडला दाओस दौऱ्याचा हिशेब

नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांचे मृत्यूच्या घटनेवर सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राज्यातील नांदेड ,संभाजी नगर, नागपूर आणि ठाणे या मधील ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत आहे. या सर्व घटनेला राज्यातील खोके सरकार जबाबदार आहे. या सरकारमधील या विभागाच्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र राज्यातील नैतिकताहीन सरकारला सर्वसामान्य जनतेने संदर्भात कुठलेही सदभावना नाही आहे,” असे देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -