घरमहाराष्ट्रअमोल कोल्हेंची आढळराव पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया; म्हणाले...

अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया; म्हणाले…

Subscribe

"गेले सहा दशकांपासून महाराष्ट्राचे राजकारण शरद पवाराभोवती फिरत आहे. यामुळे अध्यपदावरून निवृत्त होण्याची भावना समजून गेणे गरजेचे आहे", अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी शरद पवारांच्या निवृत्तीवर दिली

मुंबई | “अमोल कोल्हे भाजपमध्ये जात असतील, तर चांगली गोष्ट आहे”, असे सूचक विधान शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao AdhalRao Patil) यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांवर वक्तव्यावर मवाळ प्रतिक्रिया दिली.

पिंपरीत आढळराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “अमोल कोल्हे भाजपसोबत जाणार की नाही माहीत नाहीत. पण, त्यांची भाजपची जवळीक वाढली आहे. अमोल कोल्हे भाजपत आले, तर चांगलीच गोष्ट आहे. शिवसेना-भाजप युती वाढावी हीच आमची भूमिका आहे. आमच्या दृष्टीने शिवसेना-भाजप युती वाढणे महत्त्वाचे आहे. अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर, चांगलीच गोष्ट आहे. अमोल कोल्हे कोणत्या मतदारसंघातून उभे राहतात, यावर मी त्यांचा प्रचार करणे अवलंबून आहे.”

- Advertisement -

भाजप शिवसेना सोडून जाणार नाही – आढळराव पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आले, तर तुमच्या शिवसेनेचे काय होईल? असा सवाल पत्रकारांनी आढळराव पाटलांना विचारल्यावर ते म्हणाले, “भाजप शिवसेनाल सोडून असे काही करेल, तसे मला वाटत नाही. आम्ही सगळे एक आहोत. तसे झाले तरी आम्हाला काही अडचण नाही.”

- Advertisement -

आढळराव पाटलांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

“शिवाजीराव आढळराव पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. माझी आढळराव पाटील यांच्याशी शिवसेरीवर शेवटची भेट झाली होती. मी १७ तारखेला यावर सविस्तर बोलेन”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्लेंनी दिली आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांवर प्रतिक्रिया दिली.

शरद पवारांनी विचार करून निर्णय घेतला

“शरद पवारांच्या निवृत्तीवर अमोल कोल्हे म्हणाले, “गेले सहा दशकांपासून महाराष्ट्राचे राजकारण शरद पवाराभोवती फिरत आहे. यामुळे अध्यपदावरून निवृत्त होण्याची भावना समजून गेणे गरजेचे आहे. याबाबत ते विचार करून निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी शरद पवारांच्या निवृत्तीवर दिली.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -