घरमहाराष्ट्रबाळासाहेब आज असते तर त्यांनीही पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं असतं; का म्हणाले मुख्यमंत्री असं

बाळासाहेब आज असते तर त्यांनीही पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं असतं; का म्हणाले मुख्यमंत्री असं

Subscribe

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11 वा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक दादरच्या शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी आले. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोर्ट येथील रीगल सिनेमा चौकातील बाळासाहेब ठाकरेंच्या भव्य पुतळ्याला वंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले असते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, “अयोध्येत राम मंदिर व्हावे, हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण करत आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “राज्यात सर्व घटकांना सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम आम्ही करत आहोत. नवीन प्रकल्प आणि योजना देखील सुरू केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणा आणि त्यांच्या शिकवणीमुळे आम्ही अशाप्रकारचे निर्णय घेतोय”, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल; राज्यपालांकडे पत्र लिहून केली कारवाईची मागणी

शिंदे-ठाकरे गटाच्या धक्काबुकीवर मुख्यमंत्री म्हणाले…

शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुकीवर मुख्यमंत्री म्हणाले, “मी आजही मुख्यमंत्री म्हणून शिवतीर्थावर जाऊ शकतो. पण वाद नको, चांगल्या कार्यक्रमाला गालबोट नको. या बाळासाहेबांना न आवडणाऱ्या गोष्टी आहेत. काल जो काही प्रकार झाला, तो दुर्दैवी प्रकार होता. या घटनेचा मी कालच निषेध केला असून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आचरण्यात आणण्याचे काम करत आहोत. 2019 च्या निवडणुकीला सत्तेची खुर्ची मिळवली होती. तेव्हा त्यांनी बाळासाहेबांचे विचार गमावले, आणि आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे”, असा अप्रत्यक्ष टोला माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -